Breaking News

गुणरत्न सदावर्तें यांचा आजपासून एसटी बंदचा इशारा पण…… या मागणीसाठी सदावर्ते यांनी दिली एसटी बंदची हाक

गुणरत्न सदावर्ते यांनी आज दिलेल्या एसटी बंदची हाक दिली आहे, मात्र सदावर्ते यांच्या या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता मात्र हा दावाही फोल ठरताना दिसतोय. राज्यभरातील एसटी वाहतूक सुरु आहे. पुणे विभागातील सकाळच्या सत्रात १०० टक्के वाहतूक सुरु आगे कोल्हापुरातही सकाळच्या सत्रातील एसटी सुरु आहेत.

तसेच माजलगाव आगारातही एसटी बसेस सुरु आहेत. त्यासोबतच ठाणे,पाटोदा,दिग्रस,हिंगोली,आणि कळंब आगारातील एसटी बससेवा १०० टक्के सुरु आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उत्सफुर्त संपात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली.

या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. आता, सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली. मात्र सदावर्तेंच्या आवाहानाला प्रतिसाद नाही. वर्धा, कोल्हापूर, माजलगाव, पैठण, ठाणे, पाटोदा आगार, दिग्रस आगार, यवतमाळ विभाग, हिंगोली आगार, कळंब आगारात एसटीची वाहतूक सुरळीत सुरू आहे त्यामुळे सदावर्ते यांचा दावा खोटा ठरला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, एसटी महामंडळाच्या ताफ्यात ८५ टक्के नादुरुस्त बसेस धावत आहे. सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला. एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने ६ नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील २५० आगारातील सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व बस फेऱ्या एसटी आगारातून व्यवस्थित मार्गस्थ झाल्या आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाहीये अशी माहिती एसटी कडून देण्यात आली आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

अजित पवार यांचा शरद पवारांवर आरोप, फसवणूक असे म्हणणार नाही, पण…

२०१४ पर्यंत आपल्याला भाजपासोबत जायचं आहे. हे यांच्या गावीही नव्हतं. का तर तो पर्यंत ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *