Breaking News

तुरूंगातून अरविंद केजरीवाल यांचा संदेश, भाजपाचा तिरस्कार करू नका…

काल सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या लिकर पॉलिसीप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात २८ मार्च पर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी कोठडीत ठेवले. दरम्यान तुरुंगात गेल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांची पत्नी सुनिता यांच्या माध्यमातून आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी संदेश दिला आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन सुनिता केजरीवाल यांनी वाचून दाखवितानाचा एक व्हिडिओ आम आदमी पार्टी राजकिय पक्षाच्या एक्स या सोशल मिडीया मायक्रोब्लॉगिंगवर साईटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला.

सुनिता यांनी अरविंद केजरीवाल यांचा संदेश वाचताना म्हणाल्या की, मी तुरुंगात असो वा बाहेर, मी देशाची सेवा करण्यासाठी काम करेन. मी अनेक लढे सुरू केले आहेत आणि यापुढेही आंदोलने करत राहीन आणि त्यामुळे या अटकेने मला आश्चर्य वाटले नाही. भारताला प्रथम क्रमांकाचा देश बनवण्यासाठी आपण एकत्र काम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

अरविंद केजरीवाल पुढे आपल्या संदेशात म्हणाले की, भारतात अनेक अंतर्गत आणि बाह्य शक्ती भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण या शक्तींना ओळखून पराभूत केले पाहिजे, असे मतही यावेळी व्यक्त केले.

“दिल्लीतील माता भगिनींना आश्चर्य वाटत असेल की केजरीवाल आत गेले आहेत, आता आम्हाला आमचे ₹१,००० (या वर्षीच्या अर्थसंकल्पात नवीन योजना सुरू होईल) मिळेल का? मी त्यांना माझ्यावर विश्वास ठेवण्याची विनंती करतो. मी लवकरच बाहेर पडेन” असा विश्वासही यावेळी अरविंद केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केला.

संदेशात अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, मी कधी वचन दिले आणि ते पूर्ण केले नाही? तुमचा मुलगा आणि भाऊ लोखंडाचे बनलेले आहेत. मी खूप बलवान आहे. माझी एकच विनंती आहे. मंदिरात जा आणि माझ्यासाठी आशीर्वाद घ्या,” असेही दिल्लीवासियांना केजरीवाल यांनी आवाहन केले.

परवा रात्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी वादावादी झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. तर काही ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि लाडूचे वाटप करून आनंद साजरा केल्याचे चित्रही पाह्यला मिळाले. या सगळ्या घडामोडीवर आम आदमी पार्टीने मात्र देशभरात भाजपाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपा आणि आम आदमी पार्टीच्या कार्याकर्त्यांमध्ये तणाव निर्माण होताना दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर ईडीच्या अटकेत असलेल्या आप कार्यकर्त्यांना दिलेल्या संदेशात अरविंद केजरीवाल म्हणाले, माझ्या अटकेमुळे भाजपा सदस्यांचा द्वेष करू नका; ते आपलेच भाऊ आहेत, अशी सूचनाही यावेळी आपच्या कार्यकर्त्यांना केली.

Check Also

श्याम मानव यांचा मोठा गौप्यस्फोट: अनिल देशमुख यांनी दिला दुजोरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथपत्र द्या, नाही तर अजित पवार यांच्या विरोधात द्या

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *