Breaking News

जपानच्या निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस यांचा ५ दिवसांचा दौऱ्यावरः या गोष्टींचा घेतला अनुभव पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला चालना

जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ५ दिवसांच्या जपान दौऱ्यावर रवाना झाले, असून या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. मात्र आज जपान सरकारच्या दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पोहचल्यानंतर त्यांनी या गोष्टींचा अनुभव घेतला.

ॉजायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्या ते या दौऱ्यात भेटी घेणार असून, जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनाही ते भेटतील. जायकाने राज्यातील अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य केले आहे हे राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात काही कंपन्यांसोबत त्यांच्या बैठकासुद्धा होणार आहेत. जपानमधील बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो ऑपरेशन्सला या दौऱ्यात ते भेटी देणार आहेत. २० ते २५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित या दौऱ्यात वाकायामा या शहरालाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत.

यापूर्वी केला होता २०१५ मध्ये दौरा

यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये फडणवीस यांनी जपानचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात ओसाका प्रांताला भेट दिली होती. जायकासोबत चर्चा केली होती. याकोहामा पोर्टला भेट दिली होती तसेच तेथील अनेक मंत्र्यांशी बैठका झाल्या होत्या.
जायकासोबत विविध प्रकल्पांसाठी झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना जायकाने वित्तपुरवठा केला. यात मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, बुलेट ट्रेन, मेट्रो-3, नागपूर नागनदी शुद्धीकरण अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याच भेटीनंतर २०१७ मध्ये जायकासोबत एमटीएचएलसाठी करार झाला होता.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *