लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता अद्याप जाहिर झालेली नसतानाच राज्यात विविध राजकिय पक्षांनी निवडणूक मोर्चेबांधणी आणि प्रचाराला सुरुवात केलेली आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने कोकण दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यात कणकवली येथील विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. परंतु उद्धव ठाकरे यांच्या टीकेला दीपक केसरकर यांनी धार्मिक प्रत्तुत्यर दिले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाहिर सभेत बोलताना दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना म्हणाले, महिन्यातून १५ दिवसातून शिर्डीला जातात म्हणून चांगले समजून शिवनेते घेतले. त्यानंतर उमेदवारी देत निवडूणही आणले. त्याचबरोबर एक चांगला माणूस चांगले काम करेल म्हणून त्यांना मंत्रिपदही दिले. पण त्यांच्याकडे श्रध्दाही नाही आणिसबुरीही नाही अशी टीका करत त्यांनी आजपर्यंत एकाही पक्षावर श्रध्दा दाखविली नाही. आपल्याला काही तरी मिळेल यासाठी सबुरी बाळगली नाही अशी टीका केसरकर यांचे नाव न घेता केली.
तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ते तांदूळ वगैरे काही करतात असे भास्कर जाधव म्हणाले. परंतु आपला त्याच्यावर विश्वास नाही. आपल्या स्वार्थासाठी ते इकडे तिकडे उड्या आरत आहेत. परंतु आज त्यांना सत्ता मिळाली, खुर्चीची उब मिळाली असेल. मात्र त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्यावर लागलेला गद्दारीचा डाग पुसला जाणार नाही. ते गद्दारच आहेत. आगामी काळात त्यांचा सुफडा साफ करायचाय आहे कामाला लागा असे आवाहनही शिवसैनिकांना केले.
त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की, ज्यांनी माझ्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पूर्ण क्षमतेने लढलो. मी माझाचा बचाव केला. तसेच या भागात शिवसेना परत आली. केवळ माझ्यामुळे असे प्रत्युत्तर देत मी साईबाबाचा भक्त असून साईबाबा शपथ सांगतो की माझ्यावर टीका करणाऱ्यांना साईबाबा आपली ताकद दाखवेल आणि त्यांची जागा त्यांना दाखवेल असे प्रत्युत्तरही दिले.