Breaking News

पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल, गुरुजीचा पुरावा आहे का, तर फडणवीस यांचे प्रत्युत्तर, तुमच्या नावात बाबा…. भिडे यास गुरुजी म्हणण्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये रणकंदन

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्षवेधी मुद्याच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला. त्या लक्षवेधीवर निवेदन करताना देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांचा उल्लेख गुरुजी असा केला. त्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेत सदरहू व्यक्ती हा स्वतःला फर्ग्युसन कॉलेजमध्ये पीएचडी करत असल्याचे सांगतो तसेच प्रोफेसर म्हणवून घेतो त्याबाबत काही पुरावा आहे का? असा सवाल उपस्थित केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाले, त्यांच्या नावातच गुरूजी असा शब्द आहे मग आता तुमच्या नावात पृथ्वीराज बाबा असे येते मग बाबा हे नाव कसे आले याबाबत मी पुरावा मागू का असा सवाल केला. यावरून विरोधक भलतेच आक्रमक झाल्याचे चित्र विधानसभेत पाह्यला मिळाले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष तुम्हाला धमकी आली आहे का…मग थांबा, असे सांगून थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मला धमकीचे फोन आले, स्वतःझ यशोमती ठाकूर म्हणतायत धमकीचे फोन आले….
विधानसभेत विरोधकांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेतली असता फडणवीसांनी निवेदन केलं. अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमरावती पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यानुसार चौकशी होईल. अमरावतीतील सभेचे व्हिडीओ उपलब्ध नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. माध्यमात जे व्हायरल होतंय, त्याचे व्हॉइस सॅम्पल घेण्यात येतील, असं अमरावती पोलिसांनी सांगितलं आहे”, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, संभाजी भिडेंचा उल्लेख ‘गुरुजी’ करण्यावरून विरोधक आक्रमक होताच फडणवीसांनी आम्हाला ते संभाजी भिडे गुरुजी वाटतात. त्यांचं नावच गुरुजी आहे, असं फडणवीस म्हणाले.

संभाजी भिडेंचा उल्लेख ‘गुरुजी’ करण्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की महाराष्ट्रात, देशात कोणत्याही प्रकारचा धार्मिक तणाव जो कुणी निर्माण करेल, त्याच्याविरोधात सरकार कारवाई करेल. अमरावतीला जे काही घडलं, तिथेही धार्मिक तणाव निर्माण करण्याचा जाणून बुजून प्रयत्न चालला होता. त्यावर तुम्ही कारवाई केली. पण तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत बोलताना दुसरं महत्त्वाचं वाक्य उच्चारलं की महिमामंडन कुणी करू नये. तुम्ही त्या माणसाला गुरुजी म्हणत आहात. काही पुरावा आहे का तुमच्याकडे? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गुरुजी म्हणायला माझी काही हरकत नाही. तुमच्याकडे पुरावा आहे का? तो माणूस फर्ग्युसन कॉलेजमध्ये पीएचडी आहे, प्राध्यापक होतो असं सांगतोय. त्याची संस्था नोंदणीकृत आहे का? त्याचे अहवाल दिलेत का? जमाखर्च दिला आहे का? हे महिमामंडन नाही का? अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाणांनी देवेंद्र फडणवीसांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रश्नांवर फडणवीस संतप्त झाले आणि त्यांनी चव्हाणांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे. यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे. आता बाबा कसं आलं याचा मी पुरावा मागू का? असा पुरावा मागता येतो का? त्यांचं नावच गुरुजी आहे. हे मतांचं राजकारण चालू आहे. ही मतांची बेगमी आहे. या देशातल्या कोणत्याही महापुरुषाचा अवमान आम्ही सहन करणार नाही. कुणीही असू द्या. माझा सख्खा भाऊ जरी असला, तरी मी कारवाई करेन, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *