Breaking News

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्यास काँग्रेसचा नकार

मागील दिवसांपासून देशातील तमाम हिंदूधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या राम मंदिराचा उद्घाटन आणि रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना २२ जानेवारी २०२४ रोजी करण्याचा कार्यक्रम अयोध्येत पार पडणार आहे. या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण कोणाला मिळाले कोणाला मिळाले नाही यावरून विविध राजकिय पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्यास नकार कळवित तो कार्यक्रम राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेने आखलेला धार्मिक कार्यक्रम असल्याचे सांगत एका प्रसिध्दी पत्रकान्वये काँग्रेसने या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्यास नकार कळविला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एक प्रसिध्दी पत्रक जारी केले असून त्यात ते स्पष्टपणे म्हणाले की, मागील महिन्यात अयोध्या येथील नियोजित राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांना २२ जानेवारी २०२४ चे आमंत्रण मिळाले असल्याचे स्पष्ट केले.

पुढे जयराम रमेश म्हणाले की, रामावर वर आपल्या देशातील कोट्यावधी लोकांची श्रध्दा आहे. तसेच धर्म ही खाजगी बाब आहे. परंतु धर्म हा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपाकडून या खाजगी मुद्याचे राजकारण करत अयोध्येत राम मंदिर उभारणीचा राजकिय मुद्दा केला. त्यातच राम मंदिर उभारणीचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत असताना आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवत भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने जाणीवपूर्वक उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे आणला. मात्र राम मंदिर प्रश्नी २०१९ साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आदर करत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि अधीर रंजन चौधरी यांनी या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याचे जाहिर केल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये जाहिर केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *