Breaking News

भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच निधन, प्रकरणाला वेगळं वळण बहिणीने व्यक्त केला घातापाताचा संशय

भाजपा नेत्या आणि ‘बिग बॉस १४’ च्या स्पर्धक सोनाली फोगट यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. २२ ऑगस्ट रोजी रात्री त्यांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. ‘बिग बॉस १४’ मध्ये वाइल्कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केल्यानंतर त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

सध्या सोनालीचा मृतदेह बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आला आहे. त्यांचे कुटुंबीय गोव्यात आल्यानंतर उद्या २४ ऑगस्टला शवविच्छेदन होईल. सोनाली या चित्रीकरणासाठी गोव्यामध्ये गेल्या होत्या.

सोनाली फोगट यांचा गोव्यात मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु सोनाली यांचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपाताचा संशय त्यांच्या बहिणीने व्यक्त केला होता. आता या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. सोनाली जिथे थांबल्या होत्या त्या ठिकाणाहून त्यांचा लॅपटॉप गायब असल्याची बाब समोर आली आहे.

सोनाली फोगटच्या फार्म हाऊसमधून त्यांचं कम्प्युटर आणि लॅपटॉप गायब झाल्याचे आढळून आले आहे. सोनालीचा पुतण्या अॅडव्होकेट विकास याने सोनालीच्या मृत्यूसाठी त्यांचा पीए सुधीर सांगवान याला जबाबदार धरलंय. सोनाली फोगटच्या हत्येचा कट सुधीर सांगवानने रचल्याचा आरोप विकासने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी सोनालीच्या पीएला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोनालीसमवेत सुधीर सांगवान गोव्यात होता, अशी माहिती मिळत आहे. सोनालीच्या कुटुंबीयांनी सुधीरवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

सुधीर सांगवान यांच्या सांगण्यावरून फार्म हाऊसमधून सोनालीचा लॅपटॉप आणि इतर वस्तू गायब करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्व डेटा आणि जमीन, मालमत्तेची कागदपत्रंही सेव्ह केलेली होती. आपलं सुधीर सागवानशी बोलणं झालं होतं आणि तो त्याच्या मामी सोनाली यांच्या मृत्यूबद्दल वारंवार त्यांची विधानं बदलत आहे,” असा आरोप विकासने केला. तसेच सुधीर सागवान यांच्याशी झालेल्या संवादाचे ऑडिओ रेकॉर्डिंगही विकासने ऐकवले.

सोनाली फोगटच्या मृत्यूनंतर गोवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. प्राथमिक तपासाअंती सोनाली २२ ऑगस्ट रोजी गोव्यात आल्या होत्या आणि त्या अंजुना येथील हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. हॉटेलमध्ये अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *