Breaking News

राम मंदिर आंदोलनाचा पाया रचणारे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहिर केल्यानंतर घरी जात केले अभिनंदन

देशातील हिंदूत्ववादी राजकारणाचा आणि अयोध्येतील बाबरी मस्जिदीच्या जागेवर राम मंदिर होता असा दावा करत राम मंदिर उभारणी आंदोलनाचा पाया रचणारे आणि नरेंद्र मोदी यांना राजकिय संधी उपलब्ध करून देणारे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज भारतरत्न जाहिर करण्यात आला. विशेष म्हणजे भारत रत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहिर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः अहमदाबाद येथील लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जात अभिनंदन केले.

या संदर्भातील एक्स या मायक्रोब्लोगिंग साईटवर ट्विट करत नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल अभिनंदन करत अडवाणी यांचे भारताच्या विकासात दिलेले योगदान हे संस्मरणीय आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी राजकिय जीवनाची सुरुवात अत्यंत सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून केली. त्यानंतर ते देशाच्या उपपंतप्रधान पदी पोहोचले असे सांगत लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार झाल्याचा क्षण हा माझ्यासाठी भावनिक क्षण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरम्यान, अयोध्येतील बाबरी मस्जिदीचा ढाचा पाडण्यासाठी आयोजित कारसेवकांच्या रथयात्रेची सुरूवात लालकृष्ण अडवाणी यांनी सुरुवात केली. तसेच देशातील सोमनाथ ते जगन्नाथ पुरी या दोन ठिकाणांच्या जीर्णेाद्धाराच्या मागणीप्रश्नीही रथयात्रा आयोजित केली. त्यावेळी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अडवाणी यांच्या रथात्रेचे गुजरातमध्ये सारथ्य करत होते. तसेच गुजरातमधील गोध्रा दंगलीवेळी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्माची आठवण करून दिल्यानंतरही गुजरातच्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे रहावेत यासाठी मोदींची पाठराखण केल्याची चर्चा राजकिय वर्तुळात अद्यापही चविने चर्चिली जात आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

पत्र जारी करूनही प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘वंचित’चा अद्याप मविआत समावेश नाही

वंचित बहुजन आघाडीचा अजून महाविकास आघाडीत समावेश झाला नाहीये, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *