Breaking News

सर्वेशने स्पप्न सांगताच राहुल गांधी, खर्गेनी दिले हे गिफ्ट

भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून जात आहे. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी हे नांदेड, वाशिम जिल्हा आणि जळगांव जिल्ह्यातून पुढे जात आहे. यापार्श्वभूमीवर काल नांदेड येथून जात असताना राहुल गांधीसोबत सर्वेश यानेही यात्रेत सहभाग घेतला. राहुल गांधी यांची भेट झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वेशला विचारले की आयुष्यात काय करायचं ठरवलं आहेस ? तेव्हा सर्वेशने आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनीअर व्हायचं पण मी अद्याप कॉम्प्युटर पाह्यला नाही आणि शाळेतही नसल्याचे राहुल गांधी यांना सांगितले. त्याचे स्वप्न राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आज पूर्ण केले.

त्यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत असलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी हे ऐकताच तात्काळ नवा कॉम्प्युटर आणला. आज सकाळी हा कॉम्प्युटर सर्वेशला बोलावून राहुल गांधी यांच्या हस्ते दिला.

भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेडच्या वाटेवर असताना राहुल गांधी यांना दोन मुलांनी सॉफ्टवेयर इंजीनियर व्हायचे बोलून दाखवले पण आपण आजपर्यंत संगणक पाहिला नाही व आपल्या शाळेतही नसल्याचे सांगितले. शाळेत संगणकच नाही तर या मुलाचे स्वप्न कसे पूर्ण होणार हे जाणून राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या मुलाला संगणक भेट दिला. आता या मुलाच्या स्वप्नाला बळ मिळाले.

पण ही एका मुलाची गोष्ट झाली, हिंदुस्थानमधील प्रत्येक मुलाचे स्वप्न साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशातल्या प्रत्येक मुलाने  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वप्न पूर्ण करावे. परंतु भाजपा सरकारच्या नाकर्तेपणामुळे लाखो मुले कोरोना काळात संगणक नसल्याने ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले.  भारत जोडो यात्रा अशा स्वप्नांना मुर्त रुप देण्याचे काम करत असल्याचे सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *