Breaking News

कचरा डेपो प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या लक्ष घालण्यावरून भाजप-सेना आमने-सामने विधानसभा अध्यक्ष बागडे यांचे खासदार चंद्रकांत खैरेंवर टीकास्त्र

रंगाबादः जगदीश कस्तुरे

शहरातील कांचनवाडी परिसरातील कचरा डेपो हलविण्यावरून शिवसेना आणि भाजपचे स्थानिक नेते एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. त्यातच खासदार चंद्रकांत खैरे यांनी याप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्याने त्यांनाच धारेवर धरण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बचावार्थ विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी खैरेंवर टीका केली. त्यामुळे कचरा डेपोच्या प्रश्नावरून राज्याच्या सत्तेतील भागीदार असलेले भाजपशिवसेना आमने सामने आल्याचे चित्र औरंगाबादेत दिसून येत आहे.

कांचनवाडी परिसरात हलविण्यात आलेला कचरा डेपो इतरत्र नेण्यासंदर्भात या भागातील नागारीकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. नवनियुक्त पालकमंत्री डॉ.दिपक सावंत यांनीही या नागरीकांना शनिवार पर्यंत पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते अद्याप शक्य झाले नसल्याने याप्रश्नी दोन दिवसाखाली दगडफेकीची घटना घडत दोन एसटी बसेसचे नुकसान झाले. त्यामुळे कचरा प्रश्नावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती द्यावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांना दिले असून तेथील प्रत्येक गोष्टीची माहिती स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहे.

याबाबत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शिवसेनेला या कचरा प्रश्नावर बदनाम करण्याचा चंग भाजपा ,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसने बांधला आहे. शहरातील २० लाख नागरिकांना वेठीस धरले जात आहे. कचरा डेपोची जागा ग्रीन झोन मधून येलो झोन मध्ये आली असताना भाजपाला केवळ औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघाची काळजी असल्याने त्यांच्याकडून याबाबत प्रश्न चिघळवत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला.

कचरा डेपोतील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यात काही महिन्याचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे कचरा डेपो नारेगाव परिसरातच रहावा अशा आशयाचे शपथपत्र विभागीय आयुक्त पुरषोत्तम भापकर हे सोमवारी खंडपीठात दाखल करणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री पोलिस महासंचालकांच्या नियंत्रण कक्षाला सांगून कचरा डेपो प्रकरणात अपडेटस घेत असतात. हा प्रकार आपल्याला आवडला नसून याबाबत फडणवीसांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरवासियांना सगळं माहिती आहे कोण काय करतं ते. राष्ट्रवादी काँगेस आणि काँगेसच्या गळ्यात गळे घालून जिल्हा परिषदेत शिवसेना फिरतीय. तरी सुध्दा या प्रकरणात भाजपा कसा काय दोषी असू शकतो असा सवाल करत शिवसेनेनेच स्वतःची तपासणी करावी असा उपरोधिक टोला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी लगावला.

ते खासदार असूनही त्यांना महापालिकेत डोकवायची सवय आहे. ती बंद करा असे मी त्यांना सल्ला दिला होता. पण ते ऐकत नाहीत. खरं म्हणजे कचरा प्रश्न हा शिवसेनेनेच चिघळवलेला प्रश्न असून चार पाच महिन्यांपूर्वी मी खा.खैरेंना सल्ला दिला होता की कचरा डेपो प्रश्नात लक्ष घालून कचर्‍यावर रासायनिक प्रक्रिया करा पण खैरे ऐकतच नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

Check Also

पुण्याचे काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांचे पोलिस ठाण्याच्या आवारातच धरणे आंदोलन

लोकसभा निवडणूकीसाठी ४ थ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात उद्या १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *