Breaking News

अशोक चव्हाण यांचे प्रत्युत्तर, काँग्रेस आघाडीने कार्यकारी पदांची कंत्राटी भरती केली नाही देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना दिले प्रत्युत्तर

काँग्रेस आघाडी सरकारने कधीही कार्यकारी पदांची कंत्राटी भरती केली नाही, आता मात्र तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस अशा पदांवर सुद्धा कंत्राटी भरतीचा प्रयत्न झाला आहे. काँग्रेस आघाडी सरकारवर खापर फोडून राज्य सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करतेय असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

तसेच अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले, आज राज्य आर्थिक अडचणीत असताना काही तरी जुने संदर्भ काढून टीका करण्यापेक्षा राज्य सरकारने प्रशासकीय बाबींवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे असा खोचक सल्लाही देवेंद्र फडणवीस यांना दिला.

कंत्राटी भरतीचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व अन्य आघाडी सरकारच्या कार्यकाळात झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आमच्या सरकारने कधीही कार्यकारी पदांची कंत्राटी भरती केली नसल्याचे ते म्हणाले . राज्य सरकारने आज कंत्राटीभरती रद्द करण्याबाबत घेतलेला निर्णय हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा विजय आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे राज्य सरकारला झुकावे लागले आणि कंत्राटीभरतीचा शासननिर्णय रद्द करावा लागला, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *