Breaking News

आशिष शेलार यांचा पलटवार, उद्धव ठाकरे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त उबाठाने आदित्य ठाकरे यांना लोकसभेला उतरवून निवडून आणून दाखवावे

कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त आहेत अशी खरमरी टीका करीत तुम्ही आदित्य ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत उतरून निवडून आणून दाखवा असे थेट आव्हान मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटाला प्रत्युत्तर देताना दिले.

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतींना काळाराम मंदिरातील उपस्थितीबद्दल लिहिलेल्या पत्राविषयी बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, आज लवकर सकाळी उठल्यामुळे त्यांची डोळ्यावरची झोप आणि झडप गेली नसावी म्हणून उद्धव ठाकरे यांना काही घडलेल्या आणि सत्य घटनांचे ज्ञान नाही. संजय राऊत यांनी त्यांना दिलेली स्क्रिप्ट मुद्दाहून अडचणीत आणणारी आणि चुकीची दिलेली असावी. उद्धव ठाकरे आमच्या विश्व हिंदू परिषदेच्या ट्विटर हँडलवर जरी केले असते तरी त्यांना दिसले असते की, कालच देशाच्या राष्ट्रपतींना विश्व हिंदू परिषदेने निमंत्रण दिले आहे आणि हे २४ तासानंतर जागे झाले आहेत. त्यामुळे निमंत्रण राष्ट्रपतींना पोचले आहे. यांनी सांगण्याची काही गरज नाही. यांच्या सांगण्यावरून कुणाला आम्ही निमंत्रण देणार नाही आणि हे बोलले म्हणून यांनाही आम्ही निमंत्रण देणार नाही अशी खोचक टीकाही केली.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेले टीकेला उत्तर देताना मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, एकनाथ खडसे यांना तिकडे गेल्यावर स्मृतिभ्रंश झाला असेल माझी त्यांना विनंती आहे, आपण टीका जरूर करा पण त्या टीकेला तथ्य असू द्या. कालच्या घटनेचा उल्लेख केला असता शेकडो कोटीच्या कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजन विकासाला गती देणारे आहे आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झाल्याची आठवणही करून देत महायुतीचा मेळावा यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियलमध्ये होईल तर उपनगरातील दुसरा मेळावा वांद्रे येथील रंगशारदा येथे होईल. महायुतीतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा एकत्रितपणे होईल. मुंबईतील सहाही जागा निवडून आणू यासाठी आम्ही सर्व पक्षांनी कंबर कसली असल्याचा निर्धारही यावेळी बोलून दाखविला.

आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बोलण्याची पातळी उद्धव ठाकरे यांना अजून आली नाही. उद्धव ठाकरे स्वतःला घरंदाज, कुटुंबप्रमुख म्हणणार असतील त्यांना माझा सवाल आहे उद्धवजी जर तुमचा सख्खा भाऊ तुमच्या विरोधामध्ये न्यायालयात केस दाखल करतो, जर तुम्ही तुमच्या सख्ख्या बहिणीला घरातून बाहेर काढता, जर तुमचा चुलत भाऊ तुम्हाला घरात किंवा परिवारात चालत नाही, जर वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी तुम्हाला न्यायालयात जावे लागते तर तुम्ही कुटुंबप्रमुख आणि घरंदाज कसे? त्यामुळे तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका. मोदींचे कुटुंब आणि मोदींचे घर १४० कोटी जनता आहे. स्वतःच्या परिवारापेक्षा देश हापरिवार मानणे ही त्यांची भूमिका आणि माझे कुटुंब माझा परिवार ही तुमची भूमिका कोठे? यासाठी तुम्ही क्लासेस लावावी लागते मी चाटे क्लासेसला याबाबत जरूर विनंती करेन असा उपरोधिक टोलाही लगावला.

आशिष शेलार म्हणाले, शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. उद्धव ठाकरे यांचे भाषण त्यांना आलेले नैराश्य दाखवत आहे. कल्याण डोंबिवली शहरात उद्धव ठाकरे (उबाठा) यांच्या पक्षाची एक जागा निवडून आणून दाखवावी. मर्दांचा पक्ष उबाठा असेल तर त्यांनी स्वतः किंवा स्वतःच्या सुपुत्राला लोकसभेला निवडून आणून दाखवावे असे आव्हानही दिले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *