Breaking News

राजपत्राचा दाखला देत असादुद्दीन औवेसी म्हणाले, फक्त औपचारीता पूर्ण करतायत… बहुपक्षिय संसदीय लोकशाही प्रणालीला धोका

लोकसभा निवडणूकांना अजून काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यातच देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापनाही केली आहे. लोकसभा निवडणूकीच्या काही महिने अगोदर देशातील पाच राज्यात निवडणूका होऊ घातल्या आहेत. मात्र तिसऱ्यांदा भाजपाला अर्थात नरेंद्र मोदी यांना बहुमताने पंतप्रधान पदी बसविण्यासाठी आता इतर राजकिय पक्षातील नेत्यांना फोडण्याचे काम सुरु केले. मात्र या धाक-दपटशाहचा गवगवा व्हायला लागल्याने आता भाजपाने एक देश एक निवडणूक अर्थात One Nation One Election ही नवी नियमावली आणण्याची तयारी सुरु केली. यापार्श्वभूमीवर काल शनिवारी भारताचे राजपत्रही प्रसिध्द करण्यात आले. त्याचा दाखला देत एमआयएमचे खासदार असादुद्दीन औवेसी यांनी टीका करत यामुळे देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण होणार अशी भीती व्यक्त केली.

असादुद्दीन औवेसी म्हणाले, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कायद्यातील तरतूदीनुसार सांसदीय लोकशाही साठी महत्वाचे असलेल्या बहुपक्षिय राजकारणाला आणि केंद्र राज्यातील फेडरलिझम या तत्वाला धोका निर्माण होणार असल्याचे ट्विट केले.

तसेच असादुद्दीन औवेसी पुढे आपल्या ट्विट म्हणाले की, एक देश एक निवडणूकांच्या बाबत मोदी सरकारने यापूर्वीच ठरविले आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राजपत्रातील तरतूदी पाह्यल्या तर ते फक्त औपचारिकाता पूर्ण करतायत असा आरोपही केला.

तसेच पुढे बोलताना असादुद्दीन औवेसी म्हणाले, निवडणूकांमध्ये पुन्हा जिंकून येण्यासाठी गॅसच्या किंमतीत कपात करण्यात आल्या आहेत. जर मोदींनी पुन्हा निवडणूका जिंकल्या तर पुढील पाच वर्षे कोणत्याही जबाबदारी शिवाय ते विशिष्ट समुदायाच्या विरोधात धोरण राबविण्यात खर्च करतील अशी भीतीही व्यक्त केली.

Check Also

नाना पटोले यांची मागणी, हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यातील चर्चा जाहीर करा

मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदे फडणवीस पवार सरकारने फसवणूक केली आहे, आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे पाप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *