Breaking News

अंबादास दानवे यांनी कोश्यारींना पत्राद्वारे केली विनंती,… गद्दार दिन साजरा करण्यासाठी युनोला पत्र लिहा

शिवसेनेची स्थापना होऊन जवळपास ६० वर्षे पूर्ण होत आली आहेत. परंतु ५८ व्या वर्षीच शिवसेनेत बंडखोरी होऊन पहिल्यांदाच दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर या सर्व बंडखोरींच्या घटनांमागे तेव्हाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच भगतसिंग कोश्यारी यांच्या त्यावेळच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले. या सगळया पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठवित गद्दारी जाणून घेण्यासाठी ३२-३३ देशांनी पुढाकार घेतल्याने २० जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्यासाठी युनोला पत्र पाठवावे अशी मागणी केली.

यावेळी अंबादास दानवे यांनी भगतसिंग कोश्यारी यांना उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर आपण राज्यपाल म्हणून अविरत त्रास देण्याचे काम अविरत सुरु ठेवले होते असा खोचक आठवण करून दिली.
तसेच हे काम कमी म्हणून की काय दिल्लीच्या पातशाहच्या मार्गदर्शनाखाली सुर्याजी-पिसाळ-खंडूजी खोपडे यांच्या गद्दारीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात गद्दारी फोफावण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. याची परिणती २० जून २०२२ रोजी शिवसेना पक्षातून ४० आमदारांनी गद्दारी करून शिवसेनाप्रमुख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे पाप केले. असे म्हणतात ही गद्दारी जाणून घेण्यासाठी जगातील ३२-३३ देशांनी माहिती घेतली.

अशा गद्दारीची जगातील एवढ्या देशातील जनतेचे लक्ष वेधले जात असेल तर जागतिक गद्दार दिन साजरा होवू शकतो. तो व्हावा म्हणून आपण आपल्या दिल्लीच्या पातशहांमार्फत युनो कडे प्रयत्न करावे अशी विनंतीही भगतसिंग कोश्यारी यांना अंबादास दानवे यांनी पत्रादवारे केली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

केसरकरांच्या त्या व्हिडिओवर सुप्रिया सुळे यांचा सवाल, या मंत्र्यांना झालंय तरी काय?

रविवारी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारालाच भरती कधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *