Breaking News

आदित्य ठाकरे यांचा विश्वास, २०२४ मध्ये परिवर्तन घडणार म्हणजे घडणार

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने आता हळू हळू राजकिय नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकिय दौरे सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे सध्या यवतमाळ दौऱ्यावर गेले होते. तेथे आयोजित सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘यवतमाळ वाशीम जिंकणार म्हणजे जिंकणारचं असा विश्वास व्यक्त करतानाच. सभेसाठी आलेली प्रचंड जनता ही पैसे देऊन आणलेली नाही, स्वतः बदलासाठी उत्स्फूर्तपणे आलेली आहे.’ असंही यावेळी सांगितले.

२०२४ मध्ये परिवर्तन घडणार म्हणजे घडणार, आपले सरकार येणार म्हणजे येणार -आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना ‘अब की बार भाजपा तडीपार’ चा नारा दिला. तसंच यावेळी देशात परिवर्तन घडणार म्हणजे घडणारचं, आणि आपलं सरकार येणार म्हणजे येणारचं, असा विश्वास व्यक्त करत केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अश्रू धुराचे नळकांडे फोडले, पण स्वामिनाथन आयोग लागू झाला का ? महिलांचा अपमान झाला. या जिल्ह्यात महिलांवर अत्याचार झाला, मात्र अत्याचाऱ्याला मंत्रिमंडळात बसवलं जातं. या सरकारने ज्या बिल्कीस बानोवर अत्याचार झाला, त्या आरोपीचा सत्कार केला जातो. त्यामुळे जनता इंडिया आघाडी सोबत आहे, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

जगभरात भाजपाने भारताची बदनामी केली

आम्ही दिल्लीत होतो इंडिया आघाडी ची सभा होती, ती प्रचार सभा नव्हती सुनीता केजरीवाल आणि सोरेन यांना ताकद देण्यासाठी सभा होती.. मोठ्या प्रमाणावर दिल्लीकर नागरिक उपस्थित होते. त्यामुळे दिल्लीतील ७ जागा काँग्रेस आणि आप जिंकेल.. केजरीवाल, हेमंत सोरेन यांना अटक केली, कारण ते लढत आहेत. पण याने आपल्या भारताची बदनामी जगभरात केली आहे भाजपाने. आपण अन्याय विरोधात लढतोय .. भाजपा सोबत कोणी न्हवतं तेव्हा शिवसेना म्हणून आपण सोबत राहिलो .. त्यांचे अच्छे दिन आले तेव्हा त्यांनी युती तोडली. वापरा आणि फेका ही वृत्ती त्याची दिसून येते अशी टीकाही यावेळी आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *