Breaking News

प्रकाश आंबेडकर यांची टीका, राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातंय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेवर टीकास्त्र

आम्हाला फक्त समाजातच नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जात आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे . भाजपा-आरएसएसचा उगम होताच सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत अशी टीका आंबेडकर यांनी आज ट्वीट करीत केली आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वात देशभरातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली. मात्र, महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी न करून घेतल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज काँग्रेसवर आगपखंड केली आहे

इंडिया आघाडीत येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात? असा सवाल आंबेडकर यांनी विचारला आहे.

लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का याबद्दल मला शंकाच आहे, असा सुर आळवत आंबेडकर यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Check Also

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *