Breaking News

कोकणकरांसाठी मुंबई गोवा हायवेवरील खड्डे स्पर्धा -२०२३ आयोजन ‘कोकणभूषण’, ‘कोकणगौरव, 'कोकणगुणीजन, पुरस्कार

भारतीय पदवीधर प्रतिष्ठान आणि कोकण सेना, युवाशाही संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील रायगड ,रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा हायवेवर गणेशोस्तवानिमित्त प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी “हायवेवरील खड्डे स्पर्धा- २०२३” या विषयाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भारतीय पदवीधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल अनंत पवार यांनी प्रसिद्धिपत्रकारद्वारे दिली.

गेली १३ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा हायवेवर पडलेल्या खड्ड्यांचे स्पर्धकांनी स्वतःचा सेल्फी काढून खड्यांचे ऑनलाईन फोटो किंवा व्हिडिओ किंवा व्हिडिओ रील पाठवा. स्पर्धकाने स्वतःचे नाव, परिचय, शहराचा गावचा पत्ता मोबाईल क्रमांकासह, रस्त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ किंवा व्हिडिओ रील काढलेल्या संबंधित जिल्ह्याचे, तालुक्याचे / गावाचे ठिकाणाचे नाव,संबंधित विधानसभा आणि लोकसभा क्षेत्राचे नाव आदी माहिती पाठवा. सेल्फी निवडक फोटो/व्हिडिओ यांना पुरस्कार आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धक कोकणातील रहिवाशी हवा ही अट बंधनकारक आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खड्यांचे स्वतःचा सेल्फी काढून ऑनलाईन फोटो किंवा व्हिडिओ किंवा व्हिडिओ रील साठी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक :1) गट : संपूर्ण कोकणासाठी कोकणस्तरीय पुरस्कार: सर्वांसाठी खुल्ला गट प्रथम क्रमांक : कोकणभूषण आणि आकर्षक ट्राफी, द्वितीय क्रमांक:कोकणगौरव आणि आकर्षक ट्राफी तृतीय क्रमांक :कोकणगुणीजन आणि आकर्षक ट्राफी गट : जिल्हास्तरीय पुरस्कार 2) रायगड जिल्हा : सर्वांसाठी खुल्ला गट : प्रथम पुरस्कार – रायगडणभूषण आणि आकर्षक ट्राफी, द्वितीय पुरस्कार – रायगडगौरव आणि आकर्षक ट्राफी, तृतीय पुरस्कार – रायगडगुणीजन आणि आकर्षक ट्राफी ) 3) रत्नागिरी जिल्हा : सर्वांसाठी खुल्ला गट , प्रथम पुरस्कार – रत्नागिरीभूषण आणि आकर्षक ट्राफी, द्वितीय पुरस्कार-रत्नागिरीगौरव आणि आकर्षक ट्राफी, तृतीय पुरस्कार -रत्नागिरीगुणीजन आणि आकर्षक ट्राफी 4) सिधुदुर्ग जिल्हा : सर्वांसाठी खुल्ला गट, प्रथम पुरस्कार – सिधुदुर्गभषण आणि आकर्षक ट्राफी, द्वितीय पुरस्कार – सिधुदुर्गगौरव आणि आकर्षक ट्राफी, तृतीय पुरस्कार – सिधुदुर्गगुणीजन आणि आकर्षक ट्राफी, गट : सामाजिक संस्था / संघटना / गाव किंवा शहरातील मंडळांसाठी 5)रायगड जिल्हा : प्रथम पुरस्कार – रायगडभूषण आणि आकर्षक ट्राफी, द्वितीय पुरस्कार – रायगडगौरव आणि आकर्षक ट्राफी, तृतीय पुरस्कार-रायगडगुणीजन आणि आकर्षक ट्राफी, 6)रत्नागिरी जिल्हा : प्रथम पुरस्कार – रत्नागिरीभूषण आणि आकर्षक ट्राफी,द्वितीय पुरस्कार -रत्नागिरीगौरव आणि आकर्षक ट्राफी , , तृतीय पुरस्कार -रत्नागिरीगुणीजन आणि आकर्षक ट्राफी 7) सिधुदुर्ग जिल्हा: प्रथम पुरस्कार – सिधुदुर्गभूषण आणि आकर्षक ट्राफी, द्वितीय पुरस्कार – सिधुदुर्गगौरव आणि आकर्षक ट्राफी, तृतीय पुरस्कार -रत्नागिरीगुणीजन

आणि आकर्षक ट्राफी अशाप्रकारे कोकणकरांसाठी तब्बल २१ पुरस्कारांचे स्वरूप असणार आहे. स्पर्धकाने स्वतःच्या सेल्फीसह फोटो किंवा विडिओ अथवा व्हिडिओ रील मो.क्र.7977934800 (व्हाट्स अप) किंवा ई-मेल – [email protected] येथे अंतिम तारीख ०२ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत पाठविण्याचे आवाहन भारतीय पदवीधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल अनंत पवार यांनी केले आहे. स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोकण सेनेचे अध्यक्ष प्रसाद साळवी,सरचिटणीस सत्यवान जाधव आणि युवाशाही संघटनेच्या अध्यक्षा अश्विनी कडू यांनी केले आहे.

Check Also

संजय शिंत्रे यांचे आवाहन, आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी

सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *