Breaking News

शरद पवार धमकी प्रकरणी सुप्रिया सुळे यांचा इशारा,…. तर देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री जबाबदार शरद पवारांना सोशल मिडियावर धमकी ; खासदार सुप्रिया सुळे आणि शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी आल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

शरद पवार यांना ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी सोशल मिडियावर विशेषतः फेसबुकवर देण्यात आली आहे. ही गंभीर बाब लक्षात आल्यावर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी सोशल मिडियावर आलेल्या त्या धमकीच्या स्क्रीन शॉटची झेरॉक्स पोलीस आयुक्तांना देण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार यांच्या सोबत काही बरं वाईट घडल्यास त्यास देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील असे सांगत पवार यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सरकारवर आहे. त्यांना योग्य ती सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी सरकारची असल्याचेही म्हणाल्या.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

‘व्हॉट्सॲप चॅटबोट’ आणि ‘आई’ महिला केंद्रित धोरण ॲप’मुळे पर्यटनाला गती

व्हॉट्सॲप चॅटबॉट लाँच केल्यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना होईल तसेच ‘आई’ महिला केंद्रित धोरणाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *