Breaking News

किरीट सोमैया यांच्याकडून शरद पवार यांच्यावर PAP घोटाळ्याचा आरोप

काही महिन्यांपूर्वी अर्थात राज्यात भाजपा प्रणित एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तास्थानी विराजमान झाले. त्यावेळी अजित पवार यांच्यावर जरांडेश्वर साखर कारखाना त्यांच्याच मालकीचा आणि हा कारखाना खरेदी करण्यासाठी जी कंपनी उभी करण्यात आली. ती कंपनीही अजित पवार यांच्या समर्थकाचीच असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील प्रचार सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसने ७० हजार कोटी रूपयांचा घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर अजित पवार यांना लगेच भाजपाने सत्तेत सहभागी झाले. मात्र आता किरीट सोमैया यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रतापराव पवार आणि त्यांचे मित्र सिरम इन्स्टीट्युटचे प्रमुख डॉ सायरस पुनावाला यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले.

किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, मुंबई महापालिका ठाकरे सरकारचा रुपये २० कोटींच्या PAP घोटाळ्यात आता शरद पवार – पवार परिवाराचे नावही पुढे आले आहे. भांडूप येथील १९०३ सदनिकेचा कॉन्ट्रॅक्ट चोरडीया बिल्डरचा पुणे येथील न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. ला देण्यात आला. न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने यासाठी शरद पवारांचे बंधू प्रताप पवार यांच्या Neo Star Infra Projects Pvt. Ltd. कंपनी सोबत केला आहे. हि जागा प्रताप पवार यांच्या Neo Star Infra Projects Pvt. Ltd. कंपनीची आहे. त्याच्या सोबत या सदनिका बांधण्यासाठीचे डेव्हलपमेंट राईट, करार चोरडिया समूहाच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने केले आहे.

१९०३ सदनिका महापालिका बाजारभावाने रु. ५८ लाखात एक सदनिका प्रमाणे घेणार आहे. ही सदनिका बांधण्यासाठीजमीन व बांधकामाचा खर्च म्हणून १५ ते १७ लाख खर्च होणार आहे. म्हणजेच एका सदनिकेच्या मागे रुपये ४० लाख नफा शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांची कंपनी व चोरडिया बिल्डर्सच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी कंपनीला मिळणार आहे. भाजपा डॉ. किरीट सोमैया यांनी या घोटाळ्याचे सगळी कागदपत्र, पुरावे आज पत्रकार परिषदेत सादर केले.

आश्चर्याची बाब अशी की प्रताप पवार यांची निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. चे शेअर कॅपिटल फक्त रुपये १ लाख आहे. परंतु या कंपनीत २०२१ मध्ये १९ मार्च २०२१ रोजी सिरम इन्स्टिट्युटने रुपये ४३५ कोटी ६% व्याज या दराने वीस वर्षासाठी या कंपनीत प्रेफरेन्स शेअर कॅपिटल म्हणून गुंतवले आहेत. या कंपनीने कोविड वॅक्सीन बनविले होते, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे.

रुपये १ लाखाचे शेअर कॅपिटल प्रताप पवार व त्यांच्या पत्नीची त्याच्यासमोर रुपये ४३५ कोटीचे गुंतवणूक ६% दराने सिरम इन्स्टिट्युट यांनी केली आहे.

रुपये १०० कोटीच्या गुंतवणूकीच्या समोर रुपये १००० कोटीचा भांडूप PAP घोटाळ्याचा फायदा/लूट चोरडिया यांचे न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी कंपनीला करण्यात Neo Star Infra projects कंपनीही सहभागी झाली आहे.

या PAP घोटाळ्याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी पुन्हा डॉ. किरीट सोमैया यांनी केली.

किरीट सोमैया यांनी सादर केलेली हीच ती कागदपत्रे

Check Also

राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या स्वदेशी ‘सीएआर- टी’ पेशीवर आधारित उपचार प्रणालीचे लोकार्पण

भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. ‘सीएआर-टी सेल उपचार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *