Breaking News

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, मंत्र्याच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना डांबले

भाजपाचे उमेदवार पियुष गोयल यांचे चिरंजीव धृव गोयल यांच्या ठाकूर कॉलेज मध्ये कार्यक्रमात संबोधित करायला गेले होते, तेव्हा विद्यार्थ्यांना डांबून बसविण्यात आले त्यावर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केला. जगाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांनी रंग पकडतो विद्यार्थी एखादी भूमिका घेतो तेव्हा तेव्हा तेव्हा देशात मोठे बदल झाले असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमधून भाजपाला दिला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पियुष गोयल यांचे चिरंजीव कांदिवलीत कॉलेजमध्ये भाषण द्यायला गेले होते. तिथे विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केला. गुजरात आणि बिहारमध्ये आंदोलन सुरु केलं होतं. बिहार, गुजरातमधले सर्व विद्यार्थी रस्त्यावर आले होते. त्यानंतर इंदिरा गांधींना उतरती कळा लागली. विद्यार्थी रस्त्यावर येतात तेव्हा तेव्हा अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतायत. आज ठाकूर कॉलेजमधला विद्यार्थी बघताना आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना कळतंय जोर जबरदस्ती कशी सुरु आहे. हे देशाला मार्गदर्शन ठरेल जी विद्यार्थ्यांनी भूमिका घेतलेली आहे. जेव्हा केव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही यायला तयार आहोत. त्यांच्यावर पोलीस केसेस करतील, मॅनेजमेंट त्रास देईल तेव्हा आम्ही त्यांच्या मागे राहू, असे आश्वासनही यावेळी बोलताना दिले.

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, काल निवडणूक आयोगाला भेटलो. सर्वात महत्त्वाची एजन्सी निवडणूक आयोग आहे. लोकशाहीला धरुन प्रक्रिया व्हायला पाहिजे होत्या, त्या होणार नाही याची काळजी घेतली जातेय. जनतेचा विश्वास आता उठत चालला आहे. एजन्सी एका विशिष्ट पक्षाला मदत करत राहिले तर कसं चालायचं? तुमच्या भूमिकेकडे देशातील सर्वांचं लक्ष आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने देखील प्रश्न उपस्थित केले. भारतीय लोकशाही आणि संसदीय लोकशाहीला बट्टा लावण्याचे हे काम आहे. विरोधी पक्षाला घाबरवण्याची वेगळी पद्धत सुरु झालीय. इलेक्शन कमिशन सरकारची कठपुतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय त्यात शरद पवार यांचा फोटो वापरू नका, चिन्हाखाली नोट लिहावी लागेल याचे पालन होत नाही आहे. आम्ही काही फोटो देखील त्यांना दिलेले आहेत. न्यायालयाचा अवमान केला, म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयात सांगणार आहोत. लोकांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजू द्या, असं आम्हाला पवार साहेबांनी सांगितलं, असेही नमूद केलं.

आमच्या मनात कोल्हापूरची जागा अतिशय महत्त्वाची आहे. शाहू महाराजांचे योगदान मोठं आहे. त्यांची परंपरा आजही कोल्हापूरकर मानतात. शाहू फुले यांचे विचार संविधानात आहेत. उदयनराजे काय करतायत? एकेकाळी आम्ही त्यांना त्यांच्या घरी जाऊन उमेदवारी दिली होती. सध्या काय करतात याचं मला माहिती नाही. त्याचं ते बघतील. आम्हाला शाहू फुले आंबेडकर यांचे विचार महत्त्वाचे आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *