मागील काही दिवसांमध्ये औरंगजेब याच्या स्टेटसवरून दंगली घडल्या जात होत्या. याबाबत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना म्हणाले, औरंगजेब हा तुर्की मंगोल वंशाचा होता. तो इथल्या मुस्लिमांचा आदर्श कसा असू शकतो असे सांगत राज्याला अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न झाला होता. पण, कुणी औरंगजेबाचं महिमा मंडन करणार असेल, तर त्याला सोडणार नाही, असा इशाराही दिला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील दंगलींची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. पण, राज्याला अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न झाला होता. कारण, औरंगजेबाचे पोस्टर, मिरवणुकी, स्टेटस अचानक अनेक जिल्ह्यांत समोर आले. हा योगायोग नाही, तर हा प्रयोग आहे. आजपर्यंत भारतीय मुस्लिमांचा हिरो औरंगजेब कधीही नव्हता. तो कधी होणार सुद्धा नाही. औरंगजेब हा आक्रंत होता. या देशाचे हिरो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आहेत. ए.पी.जे अब्दुल कलाम देशाचे हिरो होऊ शकतात. पण, औरंगजेब होऊ शकत नाही. मग, औरंगजेब आमचा हिरो होऊच शकत नाही. औरंगजेब हा टर्कीक (तुर्की) मंगोल वंशाचा होता. टर्की मंगोल वंशाचे भारतात आणि पाकिस्तानात काही लाख लोक आहेत. त्यामुळे येथील लोक औरंगजेबाचे वंशज देखील नाहीत, असं स्पष्टीकरणही दिलं.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, पण, याच्या पाठीमागे कोण आहे, हे काही प्रमाणात लक्षात आलं आहे. काहींना अटकही केली आहे. कोणत्याही परिस्थितीत धर्म आणि जातीच्या आधारावर भेदभाव करणार नाही. मात्र, कुणी औरंगजेबाचं महिमा मंडन करणार असेल, तर सोडणार नाही, असा इशारा दिला.
विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, तसेच वाऱकऱ्यांवरील लाठीचार्जच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला, ही वस्तुस्थिती नाही. महाराष्ट्रात कोणतेही सरकार वारकऱ्यांवर लाठीचार्ज करत नसते. गेल्यावर्षी आळंदीतील मंदिरात प्रवेश दिल्यावर महिलांच्या अंगावर महिला पडल्याची घटना घडली होती. त्यामुळे यंदा वरिष्ठ पोलीस अधिकारी, ग्रामस्थ, ५६ दिंड्यांचे प्रमुख आणि मंदिरांच्या विश्वास्तांची बैठक झाली. त्यात ५६ दिंड्यांना प्रत्येकी ७५ पास द्यायचे. त्यांना पहिल्यांदा प्रवेश द्यायचा आणि नंतर बाकीचे प्रवेश सुरु करायचे, असं ठरलं होतं. या निर्णयानंतर ६५ दिड्यांचे प्रत्येकी ७५ लोक मंदिरात होते. तेव्हाच जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी मंदिराबाहेर जमा झाले. विद्यार्थ्यांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला. पण, ६५ दिंड्यानंतर तुम्हाला प्रवेश देऊ, असं सांगितल गेलं. पोलीस, नागरिक, संस्थेचे चोपदार आणि पालकी प्रमुखांनी विद्यार्थ्यांना थांबण्यासाठी विनंती केली. मात्र, ते ऐकण्यास तयार नव्हते. विद्यार्थीं बॅरिगेट्स तोडून पोलिसांच्या अंगावर धावले. तरीही त्यांना थांबवण्यात आलं. पुन्हा बॅरिगेट्सपर्यंत माघारी आणलं, असा खुलासाही यावेळी केला.
यावेळी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झालेल्या नसल्याने अनेक ठिकाणी नगरसेवक नाहीत. निवडणूका घेऊ नका असे राज्य सरकारने कधीही राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिले नाहीत. मात्र यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका असून आता सर्वोच्च न्यायालयच ठरविते असा खुलासा करत म्हणाले, हवं तर तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन चौकशी करावी जेणेकरून तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल असे सांगत निवडणूकीबाबतचा मुद्दा निकाली काढला.
याशिवाय देवेंद्र फडणवीस म्हणाले, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे जसे मुंबई महापालिकेत बसतात तसे ते उपनगरातही बसतात. पण ज्या दिवशी मुंबई महापालिकेच्या निवडणूका होऊन नगरसेवक येतील त्या दिवशी लोढा यांचे कार्यालय तेथून बंद केले जाईल असे आश्वासन दिले.
त्याचबरोबर कोकणातील बारसू येथील रिफायनरीचा प्रकल्पाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्याकडील सततच्या आंदोलनामुळे हा प्रकल्प पाकिस्तानला गेला आहे असा खुलासाही केला.
LIVE | Replying to the discussion under rule 259 in Maharashtra Legislative Council.
अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानपरिषदेत उत्तर..#MonsoonSession https://t.co/7xt4LpVqLg— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) August 4, 2023