Breaking News

मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार

मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी २९ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत चालू ठेवण्यात येणार आहेत, असे मुंबई विभाग नोंदणी उपमहानिरीक्षक राजू थोटे यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना) या संबंधीचे कामकाज करण्यासाठी व १ एप्रिल रोजी दरवर्षी वार्षिक बाजारमूल्य दर प्रसिद्ध होत असल्यामुळे मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी होत असते तसेच आर्थिक वर्ष २०२३-२४ या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या कामकाजासाठी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी सर्व दुय्यम निबंधक कार्यालये वरील दिवशी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

या अनुषंगाने मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी व नोंदणी कार्यालये २९ ते ३१ मार्च रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी चालू राहणार असल्याने या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबईचे मुद्रांक जिल्हाधिकारी कृष्णा जाधव यांनी केले आहे.

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *