Breaking News

जास्त साखर खाल्ल्याने डायबिटीस होतो का? जाणून घ्या सत्य ! डायबिटीस होण्याची काय आहे कारण ? घ्या जाणून

 

मुंबई : आज अनेक जण आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात तर दुसरीकडे काही जण आपल्या आहारात चुकीच्या पदार्थाचा समावेश करतात व काहीजण अनेक पदार्थाचा गैरसमज करून घेतात. आज या लेखाद्वारे आम्ही आपणांस चार गोष्टी सांगणार आहोत ज्या केवळ गैरसमज आहे व त्यात कसलीही सत्यता नाही मात्र लोक त्याला सत्य मानतात.

गैरसमज – डाएटमधून मीठ कमी करणं सोपं आहे

सत्य – ही एका चिंताजनक बाब असून जास्तीत जास्त आपल्या सर्व जेवणात मीठाच समावेश करतात. असे बरेच पदार्थ असतात जे विना मीठ आपण खाऊ शकतो. पण आपण काळजी घेत नाही. असं केलं नाही तरी प्रोसेस्ड पदार्थांमध्ये लपलेलं मीठ तुमचा आहार घातक करू शकतात. चिकन सूप, लोणचं, पापड, पीनट बटर, ब्रेड, मॅकरोनी, पनीर,डब्बाबंद फूड इत्यादींमध्ये मीठ खूप असतं.

गैरसमज – हाडांसाठी कॅल्शिअमच गरजेचं

सत्य – आपल्या हाडांसाठी केवळ कॅल्शिअम जितकं महत्वाचे आहे तितकेच व्हिटॅमिन्स आणि खनिजही गरजेचे आहेत. सामान्यपणे ४५ वयानंतर नियमितपणे व्यायाम करायला हवा. जिम करणे दररोज चालणे इत्यादी. आपल्या सुविधेनुसार काहीही निवडा.

गैरसमज – डायबिटीसचं मुख्य कारण साखर

सत्य – लठ्ठपणा डायबिटीसचं मुख्य कारण आहे. गेल्या काही वर्षात टाइप 2 डायबिटीसच्या केसेस चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढल्या आहेत. जर वजन फार जास्त असेल तर डायबिटीस होण्याचा धोका उद्भवतो. जास्त काळ अधिक कॅलरींचं सेवन केलं तर लठ्ठपणा आणि डायबिटीसचा धोका वाढतो.

गैरसमज – फॅट फ्री डाएट हृदयासाठी चांगली

सत्य – विषय केवळ सॅच्युरेटेड फॅटचा नाहीये, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते. अमीनो अॅसिड होमोसिस्टीनची लेव्हल वाढली तर धमण्यांवर फार वाईट प्रभाव पडतो. व्हिटॅमिन बी, शरीरात होमोसिस्टीनने तयार होणाऱ्या अमीनो अॅसिडचा वापर करतं. अशात जर होमोसिस्टीन फार जास्त वाढलं तर शक्य आहे की, तुम्ही व्हिटॅमिन बी युक्त पदार्थ कमी खाऊ शकता. चांगलं आहे की, फोलिक अॅसिडयुक्त गोष्टी जसे की, हिरव्या पालेभाज्या, कंदमूळं, फळं, नट्स आणि डाळींचं सेवन जास्त करा.

Check Also

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *