Breaking News

यात्रा ऑनलाईनचा आयपीओ १५ सप्टेंबरला उघडणार किंमत बँडसहीत इतर तपशील जाणून घ्या

प्रवासी सेवा देणारी कंपनी यात्रा ऑनलाईन आयपीओ घेऊन येत आहे. कंपनीचा आयपीओ १५ सप्टेंबर २०२३ रोजी उघडणार आहे. या आयपीओचा एकूण आकार ६०२ कोटी रुपये आहे. कंपनीचे प्रवर्तक १.२१ कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकणार आहेत.

यात्रा ऑनलाईन आयपीओ १५ सप्टेंबर २०२३ रोजी उघडत आहे. तुम्ही या आयपीओमध्ये २० सप्टेंबर २०२३ पर्यंत गुंतवणूक करू शकता. तर अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओ १४ सप्टेंबर रोजी उघडेल. कंपनीने आयपीओसाठी प्राईस बँड १३५-१४२ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. कंपनीचे प्रवर्तक THCL ट्रॅव्हल होल्डिंग सायप्रस आपले १७,५१,७३९ इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकणार आहेत. याशिवाय पंडारा ट्रस्ट स्कीम आपले ४,३१,३६० इक्विटी शेअर्स देखील विकणार आहे.

शेअर्सचे वाटप २५ सप्टेंबर २०२३ रोजी केले जाईल. तर ज्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप होणार नाही, त्यांचे पैसे २६ सप्टेंबर रोजी परत केले जातील. २७ सप्टेंबर रोजी डिमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील. शेअर्सचे लिस्टींग २९ सप्टेंबर रोजी होईल.

आयपीओमध्ये ७५ टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB), १५ टक्के निव्वळ संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १० टक्के शेअर्स रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यात्रा ऑनलाईनच्या प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे ६२.०१ कोटी रुपये जमा झाले आहेत. यामध्ये THCL ला २३६ रुपये प्रति शेअर दराने २६,२७.६९७ शेअर्सचे वाटप करण्यात आले आहे.

कंपनी आयपीओद्वारे उभारलेल्या पैशाचा वापर गुंतवणूक, संपादन आणि वाढीसाठी करेल. याशिवाय कॉर्पोरेटच्या सामान्य गरजा पूर्ण करण्यासाठीही हा निधी वापरला जाईल. ऑनलाईन ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत यात्रा ही देशातील सर्वात मोठी ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी आहे.

Check Also

नवा ITR कर परतावा भरण्यासाठी प्राप्तिकर विभागाने केले हे बदल आता या तीन गोष्टींची माहिती पुरविणे झाले बंधनकारक

प्राप्तिकर विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ (AY २०२४-२५) साठी ITR-3 साठी ऑफलाइन, ऑनलाइन आणि Excel उपयुक्तता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *