Breaking News

औद्योगिक उत्पादन ५ महिन्यांच्या उच्चांकावर जुलैमध्ये आयआयपी वाढ ५.७ टक्के

जुलै महिन्यात भारताच्या औद्योगिक उत्पादनाचा वेग वाढला आहे. उत्पादन, खाणकाम आणि ऊर्जा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे जुलैमध्ये देशाचे औद्योगिक उत्पादन (IIP) ५.७ टक्क्यांनी वाढले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जुलै २०२२ मध्ये औद्योगिक उत्पादनाचा दर २.२ टक्के होता. जूनमधील आयआयपी दर ३.८ टक्के होता.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये आयआयपी (IIP) दर ५.७ टक्के हा गेल्या ५ महिन्यांतील उच्चांक असल्याचे समोर आले आहे. वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या ४ महिन्यांत भारताचा औद्योगिक उत्पादन दर वार्षिक आधारावर ४.८ टक्क्यांवर आला आहे. एप्रिल-जुलै २०२२ मध्ये हा औद्योगिक उत्पादनवाढीचा दर १०.० टक्के होता.

यापूर्वी, फेब्रुवारी २०२३ मध्ये औद्योगिक उत्पादनात सर्वाधिक सहा टक्के वाढ झाली होती. त्यानंतर मार्चमध्ये विकास दर १.९ टक्क्यांवर आला. एप्रिलमध्ये हा दर ४.६ टक्के, तर मे मध्ये ५.३ टक्क्यांपर्यंत वाढला. जूनमध्ये तो पुन्हा कमी होऊन ३.८ टक्के राहिला.

जुलै २०२३ मध्ये देशातील उत्पादन क्षेत्रातील आयआयपी दर ४.६ टक्के होता. आपण एप्रिल ते जुलै २०२३ पर्यंतचा डेटा पाहिला तर तो ४.८ टक्क्यांवर आला आहे. खाण क्षेत्रातील वाढीचा दर जुलै २०२३ मध्ये १०.७ टक्के होता आणि एप्रिल-जुलै दरम्यान दर ७.३ टक्के होता. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत खाण क्षेत्रात चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे.

विजेच्या औद्योगिक उत्पादनात जुलै २०२३ मध्ये तो ८ टक्के वाढ झाली आहे. तर आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या चार महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते जुलै या कालावधीत २.९ टक्के वाढ झाली आहे.

Check Also

अॅक्सिस बँकेतून ही कंपनी बाहेर पडणार नवीन ब्लॉक डिल करण्याच्या विचारात

ॲक्सिस बँकेत मोठ्या धमाकेदार प्रवेशानंतर सहा वर्षांहून अधिक काळ, बेन कॅपिटल खाजगी क्षेत्रातील कर्जदात्यातून पूर्णपणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *