परदेशात सुट्टीवर जाणे आणि आपल्या बजेटची चिंता न करणे चांगले असते. तुम्ही जाणार असलेल्या कोणत्याही देशाचे चलन स्वस्त असेल आणि महागाई कमी असेल तर तुम्ही सुट्टीचा चांगला आनंद घेऊ शकता. आम्ही तुम्हाला अशाच १० डेस्टिनेशन्सबद्दल सांगत आहोत जेथे तुम्हाला पैशाची चिंता करावी लागणार नाही. या देशांमधील चलन रुपयापेक्षा स्वस्त आहे. येथे प्रवास करणे तुमच्यासाठी किफायतशीर ठरेल.
इंडोनेशिया
चलन विनिमय : १ रुपया = १८० इंडोनेशियन रुपिया
इंडोनेशिया प्रत्येकाला तेथील स्फटिकासारखे स्वच्छ पाणी, बेटे आणि हवामानामुळे् आकर्षित करते. भारतीयांसाठी व्हिसा फी देखील येथे कमी आहे. येथील चलन स्वस्त असल्याने ते तुमच्या बजेटमध्येही बसेल.
व्हिएतनाम
चलन विनिमय : १ रुपया = २८५ व्हिएतनामी डोंग
व्हिएतनाम आपल्या साध्या जीवनासाठी आणि गुहांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही स्वादिष्ट पाककृतीचाही आस्वाद घेऊ शकता.
श्रीलंका
चलन विनिमय : १ रुपया = ३.७५ श्रीलंकन रुपया
श्रीलंका आपल्या हिरवळ, प्राचीन समुद्रकिनारे, पर्वत आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. भारताशी जवळीक आणि स्वस्त उड्डाणे यामुळे ते एक प्रसिद्ध ठिकाण आहे.
नेपाळ
चलन विनिमय : १ रुपया = १.६ नेपाळी रुपया
नेपाळच्या माउंट एव्हरेस्टची मंत्रमुग्ध करणारी दृश्ये पर्वतप्रेमींसाठी खूपच आकर्षक आहेत. भारतीय व्हिसाशिवाय येथे फिरू शकतात.
कंबोडिया
चलन विनिमय: १ रुपया = ५० कंबोडियन रिएल
कंबोडिया अंगकोर वाट या दगडी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. बहुतेक पर्यटक येथे पाककृती, राजवाडे, अविश्वसनीय अवशेष आणि संग्रहालये पाहण्यासाठी जातात.
जपान
चलन विनिमय: १ रुपया = १.६ जपानी येन
जपान आपल्या इतिहास, संस्कृती आणि पाककृतीसाठी प्रसिद्ध आहे.
हंगेरी
चलन विनिमय: १ रुपया = ४.१ हंगेरियन फॉरिंट
रोमन आणि तुर्की इतिहासाने प्रभावित हंगेरियन संस्कृती एक अनोखा अनुभव देते. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट हे एक रोमँटिक शहर आहे. येथे राजवाडे आणि उद्याने पाहण्यासारखे आहेत.
पॅराग्वे
चलन विनिमय: १ रुपया = ८७ पॅराग्वेयन ग्वारानी
पॅराग्वे आधुनिक शहरांसह नैसर्गिक सौंदर्याची जोड देते. तुम्हाला येथे ग्रामीण हस्तकला आणि उत्कृष्ट खरेदीच्या संधी मिळतील.
कोस्टा रिका
चलन विनिमय: १ रुपया = ६.५ कोस्टा रिकन कोलन
समुद्रकिनारे, वन्यजीव, जंगले आणि ज्वालामुखी यांसह कोस्टा रिकाचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना मोहित करते.
मंगोलिया
चलन विनिमय: १ रुपया = ४२ मंगोलियन तुगरिक
मंगोलिया स्वच्छ आकाशासह शहरी जीवनापासून विश्रांती देण्याचे काम करते.