तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही छोट्या बचत योजनेत गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. वित्त मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) किंवा इतर कोणत्याही लहान बचत योजनांच्या गुंतवणूकदारांना त्यांचा आधार क्रमांक पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जमा करावा लागेल. आधार क्रमांक न दिल्यास तुमचे छोटे बचत खाते गोठवले जाऊ शकते.
वित्त मंत्रालयाने पीपीएफ, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि इतर बचत योजनांसाठी आधार आणि पॅन अनिवार्य केले आहे. यासंदर्भातील अधिसूचना मंत्रालयाने ३१ मार्च २०२३ रोजी जारी केली होती. यानुसार, एखाद्याचे खाते चालू असेल आणि त्याने लेखा कार्यालयात आधार क्रमांक सादर केला नसेल, तर त्याला सहा महिन्यांच्या आत हे करावे लागेल. सहा महिन्यांचा कालावधी ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपेल.
वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार, एखाद्या ठेवीदाराने या बचत योजनेत आधीच खाते उघडले असेल, परंतु त्याचा आधार क्रमांक संबंधित कार्यालयात जमा केला नसेल, तर त्याने १ एप्रिलपासून ६ महिन्यांच्या कालावधीत असे करणे आवश्यक आहे. ६ महिन्यांचा कालावधी ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपणार आहे.
असे होईल नुकसान
1. तुमच्या गुंतवणुकीवरील व्याज तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही.
2. तुम्ही तुमच्या पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी खात्यांमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही.
3. मुदतपूर्तीची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही.
4. गुंतवणूकदार ६ महिन्यांच्या आत आधार क्रमांक सादर करण्यात अयशस्वी झाला, तर तो संबंधित कार्यालयाला आधार क्रमांक प्रदान करेपर्यंत त्याचे खाते निष्क्रिय राहील.