Breaking News

आयपीओ गुंतवणुकदारांसाठी कमाईची संधी या आठवड्यात ४ आयपीओ उघडणार

या आठवड्यात आयपीओ गुंतवणुकदारांसाठी मोठी कमाईची संधी आहे. चालू आठवड्यात चार आयपीओ गुंतवणुकीसाठी उघडत आहेत. यामध्ये रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग लिमिटेड, ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स लिमिटेड, ईएमएस लिमिटेड आणि कहन पॅकेजिंग या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या आयपीओबद्दल जाणून घेऊया.

रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग आयपीओ

रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग लिमिटेडचा आयपीओ ४ सप्टेंबरपासून खुला झाला आहे. आयपीओसाठी ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल. कंपनीचे शेअर्स १४ सप्टेंबर रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर सूचीबद्ध केले जातील. आयपीओसाठी प्रति शेअर किंमत ९३-९८ रुपये निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच १५० शेअर्ससाठी तर जास्तीत जास्त १३ लॉटसाठी म्हणजे १९५० शेअर्ससाठी बोली लावू शकतात.

ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स आयपीओ

ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स लिमिटेडच्या आयपीओसाठी गुंतवणूकदार ६ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या कालावधीत या आयपीओ साठी अर्ज करू शकतात. कंपनीचे शेअर्स १८ सप्टेंबर रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर सूचीबद्ध केले जातील. कंपनीने आयपीओ प्राइस बँड ६९५-७३५ रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजे २० शेअर्ससाठी अर्ज करू शकतात.

ईएमएस लिमिटेड आयपीओ

ईएमएस लिमिटेड आयपीओसाठी गुंतवणूकदार ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करू शकतात. कंपनीने प्रति शेअर किंमत २००-२११ रुपये निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच ७० शेअर्ससाठी तर जास्तीत जास्त १३ लॉटसाठी म्हणजे ९१० शेअर्ससाठी बोली लावू शकतात. आयपीओमध्ये ५० शेअर्स पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIP) आरक्षित केले आहेत. याशिवाय ३५ टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठीउर्वरित १५ टक्के शेअर्स बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) राखीव आहेत.

कहन पॅकेजिंग आयपीओ

कहन पॅकेजिंग आयपीओ ६ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. कंपनीने यासाठी प्रति शेअर ८० रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. कंपनी ७.२ लाख शेअर्सच्या विक्रीद्वारे ५.७६ कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओ ८ सप्टेंबर रोजी बंद होणार आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

EPFO ने दिली पेन्शन धारकांना खुषखबरः वाढीव पेन्शन अर्ज भरण्यास मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व निवृत झालेल्या कामगारांना जास्तीची पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *