Breaking News

२ हजाराच्या ९३ टक्के नोटा बँकांमध्ये परत, ७ टक्के नोटा बाहेरच जमा करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटेबाबत एक मोठे अपडेट जारी केले आहे. नवीन आकडेवारीनुसार, २००० रुपयांच्या एकूण ९३ टक्के नोटा बँकांकडे परत आल्या आहेत. याचा अर्थ आता बाजारात फक्त ७ टक्के नोटा शिल्लक आहेत.

रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली. रिझर्व्ह बँकेने म्हटले होते की २००० रुपयांची नोट ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करावी लागेल. मात्र, यादरम्यान २००० रुपयांच्या नोटा चलनात राहतील. दुकानदार किंवा इतर कोणीही ते घेण्यास नकार देऊ शकत नाही.

रिझर्व्ह बँकेने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, बँकांकडून मिळालेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत बँकांमध्ये जमा केलेल्या २,००० रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य ३.३२ लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ ३१ ऑगस्ट २०२३ रोजी ०.२४ लाख कोटी रुपयांच्या फक्त २,००० रुपयांच्या नोटा चलनात होत्या. हा आकडा एकूण २००० रुपयांच्या नोटांच्या ७ टक्के आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले की, २,००० रुपयांच्या सुमारे ८७ टक्के नोटा बँकांमध्ये जमा करण्यात आल्या. तर १३ टक्के नोटा इतर नोटांसोबत बदलण्यात आल्या. ३१ मार्च २०२३ रोजी चलनात असलेल्या नोटांचे एकूण मूल्य ३.६२ लाख कोटी रुपये होते, जे १९ मे २०२३ रोजी नोटा काढण्याच्या घोषणेच्या वेळी ३.५६ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. भारतीय रिझर्व्ह बँकेने लोकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकांमध्ये जमा करण्याची किंवा इतर नोटा बदलून घेण्याची विनंती केली आहे.

Check Also

आरबीआयच्या पतधोरणात वातावरणीय घटनांचा उल्लेख

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थात आरबीआय (RBI) च्या ताज्या चलनविषयक धोरण अहवालाचे (त्याच्या एप्रिल बुलेटिनमध्ये समावेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *