Breaking News

ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन मजबूत, ११ टक्क्यांनी वाढ गतवर्षाच्या तुलनेत ११ टक्क्यांनी वाढून १.५९ लाख कोटी रुपयांवर

ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलन उत्कृष्ट झाले आहे. जीएसटी संकलनात ११ टक्के वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन ११ टक्क्यांनी वाढून १.५९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलनाचे आकडे जाहीर करताना वित्त मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, महिन्यातील एकूण जीएसटी महसूल १,५९,०६९ कोटी रुपये होता. मागील वर्षी याच कालावधीत जीएसटी संकलन १.४३ लाख कोटी रुपये होते.

यामध्ये केंद्रीय जीएसटी महसूल २८,३२८ कोटी रुपये, राज्य जीएसटी महसूल ३५,७९४ कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटी महसूल ८३,२५१ कोटी रुपये होता. यादरम्यान ११,६९५ कोटी रुपये उपकर म्हणून जमा झाला. वित्त मंत्रालयाने सांगितले की, या महिन्यात वस्तूंच्या आयातीतून मिळणार्‍या महसुलात ३ टक्के आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणार्‍या महसुलात वर्षभराच्या तुलनेत १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, एप्रिल-जून तिमाहीत कर दरांमध्ये कोणताही बदल झालेला नसतानाही, जीएसटी संकलन सध्याच्या किमतींवरील जीडीपीच्या वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे. चांगले कर अनुपालन आणि कर संकलन कार्यक्षमतेत सुधारणा झाल्यामुळे हे घडले आहे, असे मल्होत्रा म्हणाले. याशिवाय करचोरी आणि कर दायित्व टाळण्याच्या प्रकरणांमध्येही घट झाली आहे.
ऑगस्ट २०२३ मध्ये जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन २३ टक्क्यांनी वाढून २३,२८२ कोटी रुपये झाले आहे. या यादीत ११,११६ कोटी रुपयांच्या कलेक्शनसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि गुजरात ९,७६५ कोटी रुपयांच्या कलेक्शनसह तिसऱ्या स्थानावर आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

चालकांच्या आंदोलनासमोर अखेर केंद्राची माघार गृह सचिवांनी दिले आश्वासन

केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या न्यायसंहिता अर्थात क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये बदल करत अपघातानंतर पळून जाणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *