Breaking News

मारुती सुझुकीचा ऑगस्टमध्ये विक्रीचा विक्रम, इतकी विकली वाहने हुंदाई कंपनीही मारुतीच्या बरोबरीने

वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीच्या वाहनांच्या मासिक विक्रीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. मारुती सुझुकीने ऑगस्ट महिन्यात तब्बल १.८९ लाख वाहने विकली आहेत. मारुतीची एका महिन्यातील ही सर्वाधिक विक्री आहे. कंपनीने ऑक्टोबर २०२० मध्ये १,८२,४४८ वाहनांची विक्री केली होती.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने १,६५,१७३ युनिट्स पाठवले होते. यासोबतच कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारी १०,३९७ रुपयांच्या पातळीवर सर्वकालीन उच्चांक गाठला. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या अहवालानुसार, एकूण प्रवासी वाहनांची देशांतर्गत विक्री १.५६ लाख युनिट झाली. ऑगस्ट २०२२ मध्ये १.३४ लाख युनिट्सच्या तुलनेत हा आकडा १६ टक्के जास्त आहे. ऑल्टो, एस-प्रेसो सारख्या छोट्या कारची विक्री ऑगस्ट २०२२ मध्ये २२,१६२ युनिट्सवरून १२,२०९ युनिट्सवर घसरली.

निर्यात २४,६१४ युनिट्स

बलेनो, सेलेरियो, डिझायर, इग्निस आणि स्विफ्ट सारख्या कॉम्पॅक्ट कारने ऑगस्ट २०२२ मधील ७१,५५७ युनिट्सपेक्षा ७२,४५१ युनिट्सची विक्री केली. एमपीव्ही म्हणजे ब्रेझा, एर्टिगा, फ्रँक्स, ग्रँड विटारा, जिमनी आणि एक्सएल6 सारख्या बहुउद्देशीय वाहनांची ऑगस्टमध्ये ५८,७४६ युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विक्री २६,९३२ युनिट्स होती. ऑगस्टमध्ये कंपनीची निर्यात २४,६१४ युनिट्स होती, जी गेल्या वर्षी याच महिन्यात २१,४८१ युनिट्स होती.

ह्युंदाई इंडियाचा विक्रीचा आकडा

देशातील दुसरी सर्वात मोठी कार विकणारी कंपनी ह्युंदाई इंडियाच्या विक्रीतही १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीची घाऊक विक्री १५ टक्क्यांनी वाढून ७१,४३५ युनिट झाली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कंपनीने ६२,२१० मोटारींची विक्री केली होती. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने ऑगस्ट २०२३ मध्ये ५३,८३० युनिट्सची विक्री केली तर ऑगस्ट २०२२ मध्ये कंपनीने ४९,५१० युनिट्सची विक्री केली.

टाटा मोटर्सच्या विक्रीत घट

टाटा मोटर्सच्या एकूण विक्रीत १ टक्क्यांनी घट झाली आहे. ऑगस्टमधील एकूण विक्री १.१ टक्के घसरून ७८,०१० युनिट्सवर आली. देशांतर्गत विक्री ७६,४७९ युनिट्सवरून ७६,२६१ युनिट्सवर घसरली. याशिवाय, व्यावसायिक वाहनांची विक्री १.९ टक्के वाढून ३२,०७७ युनिट्सवर पोहोचली. देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री ३.५ टक्क्यांनी घसरून ४५,५१३ युनिटवर आली आहे.

Check Also

देशाच्या जीएसटी वसुलीत १२.४ टक्क्याने वाढ; दोन लाख कोटींचा टप्पा पार

सबंध देशभरात लोकसभा निवडणूकीतील राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांकडून आणि सर्वच लहान-मोठ्या राजकिय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *