Breaking News

सप्टेंबरमध्ये ही ५ कामे करणे आवश्यक, अन्यथा पडेल भुर्दंड आधार, २ हजाराच्या नोटा आणि अन्य महत्वाचे

सप्टेंबरमध्ये अनेक नियम बदलणार असून या नियमांबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. या महिन्यात डीमॅट खात्याचे नामांकन भरणे आणि २००० हजार रुपयांच्या नोटा बदलणे यासारख्या महत्त्वाच्या कामांची अंतिम मुदत संपणार आहे. सप्टेंबर महिन्यात कोणती ५ कामे करणे अत्यावश्यक आहे याची माहिती घेऊया.

1. आधार अपडेट

तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट करायचे असेल तर तुमच्याकडे त्यासाठी शेवटची संधी आहे. UIDAI ने आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत दिली आहे. त्याची मुदत १४ सप्टेंबर रोजी संपत आहे. यानंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. यापूर्वी ही सुविधा १४ जूनपर्यंत होती. त्यानंतर तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली.

2. २००० ची नोटा बदलण्याची संधी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) १९ मे रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. आरबीआयने देशवासियांना २००० च्या नोटा बदलण्यासाठी ४ महिन्यांची मुदत दिली आहे. ही मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत आहे.

3. बँका १६ दिवस बंद

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर महिन्यात ४ रविवार आणि २ शनिवारी म्हणजेच ६ दिवस बँका बंद राहतील. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे १० दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. या सुट्ट्या एकत्र केल्या तर फक्त १४ दिवस बँकांमध्ये काम होईल. त्यामुळे जर तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी बँकेत जावे लागत असेल तर आधी सुट्ट्यांची यादी तपासा, मगच बँकेत जा.

4. डिमॅट खात्यासाठी नामांकनांची अंतिम मुदत

डिमॅट खात्याद्वारे शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनाही ३० सप्टेंबरपर्यंत नामांकन भरण्याची आणि नामांकन मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. विहित मुदतीत नामांकन करण्यात अयशस्वी झाल्यास गुंतवणूकदारांची ट्रेडिंग आणि डीमॅट खाती गोठवली जाऊ शकतात.

5. आधार-पॅन लिंक

तुम्ही अजून तुमचा पॅन आधारशी लिंक केला नसेल तर ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत करा. तुम्ही असे न केल्यास तुमचा पॅन निष्क्रिय होईल. त्यानंतर पॅनशी संबंधित अनेक कामे थांबतील. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ३० जून २०२३ पासून पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी १,००० रुपये विलंब शुल्क आकारत आहे.

Check Also

शेअर बाजार एक हजार अंकाने घसरला

लोकसभा निवडणूकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान जवळ येत आहे. तसेच केंद्रातील भाजपाचे सरकारला तिसऱ्यांदा संधी मिळण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *