Breaking News

औद्योगिक उत्पादन आणि महागाईने गाठला उच्चांकी स्तर एकाबाजूला खुशी तर दुसऱ्याबाजूला गम

नवी दिल्ली: प्रतिनिधी

चलन निश्चिलीकरणानंतर लगेच देशात लागू केलेल्या जीएसटी करप्रणालीचा परिणाम देशातील सर्वच लहान-मोठ्या उद्योगांवर झाल्याची चर्चा चांगलीच रंगली. मात्र नोव्हेंबरमध्ये ओद्योगिक क्षेत्राने चमकदार कामगिरी दाखवित या महिन्यात औद्योगिक उत्पादन २५ महिन्यांच्या उच्चांकावर पोचले. तर औद्योगिक उच्चांकाबरोबरच महागाईनेचे चांगलाच उच्चांकी दर गाठल्याने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेसाठी कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. औद्योगिक उत्पादन वाढीचा दर (आयआयपी) नोव्हेंबरमध्ये ८.४ टक्के राहिला आहे. तर ऑक्टोंबर महिन्यात हाच दर २.२ टक्के होता. या आकड्याबरोबरच महागाईचा दरही ५.२१ टक्केवर पोहचल्याने रिझर्व्ह बँकेवर रेपोच्या दरात वाढ करण्यासाठी दबाव वाढला आहे.

औद्योगिक पातळीवर सरकारला दिलासा मिळाला असला तरी, महागाईबाबत मात्र सरकारला झटका बसला असून खाण्या-पिण्याच्या वस्तू महागल्याने किरकोळ महागाई दर ५.२१ टक्क्यांवर गेला आहे. मागील १६ महिन्यातील हा महागाईचा उच्चांक आहे. नोव्हेंबरमध्ये महागाईचा दर ४.८८ टक्के होता. सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस (सीएसओ) कडून शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

रेपो दर वाढवण्याचा दबाव

रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई ४ टक्क्याच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, ५ टक्क्यांच्या पुढे महागाई दर गेल्याने रिझर्व्ह बँकेवर रेपो दर वाढवण्याबाबत दबाव वाढणार आहे. किरकोळ महागाई दराचा उच्चांक ऑगस्ट २०१६ मध्ये होता. यावेळी महागाई दर ५.०५ टक्के राहिला होता.

भाजीपाला, अंडी, खाण्या-पिण्याच्या वस्तू महाग झाल्या आहेत. खाद्य पदार्थ डिसेंबर २०१७ मध्ये ४.९६ टक्के महागले आहेत. नोव्हेंबरमध्ये या वस्तूंचा महागाई दर ४.४२ टक्के होता. डाळींच्या दर मात्र घसरण झाली आहे. शहरी भागात महागाई दर ७.३६ टक्क्यांवरून वाढून ८.२५ टक्के झाला आहे.

उत्पादन क्षेत्राची चमकदार कामगिरी

उत्पादन क्षेत्रातील वाढीचा दर २.५ टक्क्यांवरून वाढून १०.२ टक्क्यांवर गेला आहे. तर खाण क्षेत्रातील उत्पादनात २.५ टक्के आणि उर्जा क्षेत्रामध्ये ३.२ टक्के वाढ  झाली आहे. कॅपिटल गुड्समधील वाढ ९.४ टक्के राहिली आहे.

 

Check Also

वॉरबर्ग पिंकसने विकत घेतली श्रीराम हाऊसिंग कंपनी ४ हजार ६३० कोटी रूपयांना झाला व्यवहार

न्यूयॉर्क स्थित प्रायव्हेट इक्विटी फर्म वॉरबर्ग पिंकस श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (SHFL) ला इक्विटी आणि …

One comment

  1. योगेश वट्टमवार

    चांगली बातमी….औद्योगिक उत्पादन वाढीमुळे नविन रोजगार निर्मितीसाठी पुरक परिस्थिती निर्माण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *