Breaking News

EPFO चा मोठा निर्णय, व्याज दरात केली मोठी वाढ

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. तसेच मागील १० वर्षात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या घोषणांची उजळणी अर्थमंत्री निर्मला सीतारामण, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत देशातील जनतेला किती फायदा झाला याविषयीची माहिती दिली.

दरम्यान, केंद्रीय कामदार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज EPFO च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि सीबीटीच्या संचालक मंडळाची बैठक घेतली. या बैठकीत सीबीटीच्या संचालक मंडळावर कोणाची निवड करावी यासंदर्भातील अधिकार केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना देण्याचा निर्णय घेतला. तसेच कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील ठेवीवर सरकारकडून देण्यात येणाऱ्या व्याज दराच्या संदर्भात वाढ करण्याचे अधिकारही केंद्रीय मंत्र्यांना दिले.

यावेळी EPFO अर्थात भविष्य निर्वाह निधीत कर्मचाऱ्यांकडून जमा करण्यात येणाऱ्या रकमेवर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ठेवीवरी व्याज दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय संपूर्ण वर्षभर व्याजाचा दर एकसमान देणार असल्याची घोषणाही भूपेंद्र यादव यांनी केली.

सध्या भविष्य निर्वाह निधीत जमा होणाऱ्या ठेवींवर ८.१५ टक्के दराने व्याज देण्यात येत होते. मात्र आता त्यात वाढ करत ८.२५ टक्के इतका वाढीव व्याज दर देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव जाहिर केला.

Check Also

पेटीएम, IIFL बँक आणि आता कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयची बंधन एकदम तीन बँकावर लादलेली बंधन सारखीच

भारताच्या आर्थिक परिस्थितीत, स्थिरता राखण्यात आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नियामक निरीक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *