Breaking News

एलआयसी एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी ४ मोठ्या घोषणा ग्रॅच्युइटीची मर्यादा ५ लाख केली

तुम्ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे कर्मचारी असाल किंवा एजंट म्हणून तिच्याशी संबंधित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. सरकारने एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी अनेक फायदे जाहीर केले आहेत. यामध्ये ग्रॅच्युइटी मर्यादेत वाढ, एजंट रिन्यूएबल कमिशन, टर्म इन्शुरन्स कव्हर आणि एकसमान फॅमिली पेन्शन यांचा समावेश आहे.

अर्थ मंत्रालयाने एजंट आणि कर्मचार्‍यांशी संबंधित ४ प्रमुख योजनांना सोमवारी मंजुरी दिली. या निर्णयाचा फायदा १ लाख नियमित कर्मचारी आणि १३ लाख एजंटांना होणार आहे. या माध्यमातून एजंटला आर्थिक स्थैर्य मिळू शकेल, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

एलआयसी एजंटसाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. या निर्णयामुळे एजंटांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा होऊन त्यांना अधिक लाभ मिळणार आहेत. एलआयसी एजंट भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वाढीमध्ये आणि भारतातील विमा प्रवेश वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

नवीन निर्णयानुसार जे एजंट पुन्हा एलआयसीमध्ये सामील होतात, त्यांना त्यांच्या जुन्या कामासाठी कमिशन मिळण्याचा अधिकार असेल. यामुळे त्यांना वाढीव आर्थिक स्थिरता मिळेल. सध्या एजंट कोणत्याही जुन्या एजन्सी अंतर्गत पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यवसायासाठी रीन्यूएबल कमिशनसाठी पात्र नाहीत.

सरकारने एलआयसी एजंट्ससाठी टर्म इन्शुरन्स कव्हर वाढवण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत त्याची श्रेणी ३०००-१०,००० रुपयांवरून २५,०००-१,५०,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याद्वारे एलआयसीमध्ये एजंट म्हणून काम करणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षेची हमी मिळणार

सरकारने एलआयसी कर्मचाऱ्यांना ३० टक्के समान दराने कौटुंबिक पेन्शनचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. हे कल्याणकारी उपाय एलआयसी एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील आणि त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करतील, असे सरकारने म्हटले आहे.

Check Also

देशाच्या जीएसटी वसुलीत १२.४ टक्क्याने वाढ; दोन लाख कोटींचा टप्पा पार

सबंध देशभरात लोकसभा निवडणूकीतील राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांकडून आणि सर्वच लहान-मोठ्या राजकिय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *