Breaking News

१६ मार्चला लागणार वैभव-प्रार्थनाचं ‘व्हॅाट्सअप लग्न’ सिने रसिकांसाठी म्युझिकल रोमँटिक लव्हस्टोरी

मुंबई: प्रतिनिधी

मराठी चित्रपटसृष्टीतील आजची सर्वात हॅाट जोडी कोणती असं जर कोणी विचारलं, तर वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे हे नाव अनाहुतपणे ओठांवर येतं. मराठी सिनेसृष्टीत इतरही अभिनेता-अभिनेत्रीच्या जोड्या हिट ठरत असल्या तरी वैभव-प्रार्थना या जोडी आनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांना चांगलीच भावली आहे. याच कारणामुळे ही जोडी मराठी निर्माते-दिग्दर्शकांचीही ही फेव्हरेट बनली आहे.

यापूर्वी वैभव-प्रार्थना या जोडीने ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटाद्वारे रसिकांवर जादू केली होती. आता ‘व्हॅाट्सअप लग्न’द्वारे ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा वैभव-प्रार्थनाची केमिस्ट्री अनुभवता येईल. ‘नटसम्राट’ आणि ‘दुनियादारी’ या दोन सुपरहिट चित्रपटांचे निर्माते जाई जोशी आणि नानू जयसिंघानी यांनी प्रथमच एकत्र येत ‘व्हॉट्सअप लग्न’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा १६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा व्हॅलेटाईन डेच्या आठवड्यात म्हणजेच १४ फेब्रुवारीच्या आधीच्या शुक्रवारी प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस होता, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे वैभव-प्रार्थनाच्या ‘व्हॉट्सअप लग्न’ची प्रदर्शनाची तारीख १६ मार्च घोषित करण्यात आली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही मुबलक वेळ मिळावा यासाठीही ‘व्हॉट्सअप लग्न’च्या प्रदर्शनाची तारीख मार्चमध्ये करण्यात आल्याचं चित्रपटाशी निगडीत असलेल्या विश्वसनीय सूत्रांकडून समजतं.

या चित्रपटाच्या रूपाने सिनेरसिकांना म्युझिकल रोमँटिक लव्हस्टोरी देण्याचा निर्माता-दिग्दर्शकांचा हेतू आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे ‘नटसम्राट’ या चित्रपटाचे निर्माते विश्वास जोशी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. फिनक्राफ्ट मिडिया आणि व्हिडीओ पॅलेसची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात नयनरम्य लोकेशन्सही पाहायला मिळणार आहेत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

‘लिओ’ चित्रपटाने मोडले सर्व रेकॉर्ड केली ‘इतक्या’ कोटीची कमाई थलापथी विजयचा 'लिओ' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट, अवघ्या दोन दिवसांत केली इतकी कमाई

१९ (गुरुवार) ऑक्टोबर रोजी चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित झालेल्या थलापथी विजयच्या ‘लिओ’ या तमिळ चित्रपटाने पहिल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *