Breaking News

भाऊ कदम बनणार ‘नशीबवान’ पिफ मध्ये बघायला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी

लेखक उदय प्रकाश यांनी कॅमेरामन-दिग्दर्शक अमोल गोळेवर केलेल्या कथा चोरीच्या आरोपांमुळे अचानकपणे प्रकाशझोतात आलेला ‘नशीबवान’ हा मराठी सिनेमा आज केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही चर्चेचा विषय ठरला आहे. ‘दिल्ली की दीवार’ या आपल्या कथेवर आधारित असलेल्या ‘नशीबवान’च्या लेखनाचं श्रेय न दिल्याने उदय प्रकाश नाराज झाले आहेत. पण या सर्व गोंधळात या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला असून महाराष्ट्राचा लाडका विनोदी अभिनेता भाऊ कदम ‘नशीबवान’ठरल्याचं दिसून येत आहे.

आजवर विविध राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या आणि पुरस्कारप्राप्त चित्रपटांचं छायांकन करणारा सिनेमॅटोग्राफर अमोल वसंत गोळे ‘नशीबवान’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे वळला आहे. या चित्रपटाच्या टिझरमध्ये कलाकाराचा चेहरा लपवून त्यावर ‘नशीबवान’असं केवळ शीर्षक देण्यात आलं होतं. त्यामुळे या चित्रपटातील नशीबवान कलाकार कोण? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच होती. आता यावरून पडदा उठला आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लुक वरून या चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम असल्याचे दिसते. फ्लाईंग गॉड फिल्मस् प्रस्तुत ‘नशीबवान’ या चित्रपटाचे निर्माते अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड, महेंद्र गंगाधर पाटील असून सह निर्मता प्रशांत विजय मयेकर आहेत. ‘नशीबवान’ या चित्रपटाचीही निवड ११ ते १८ जानेवारी दरम्यान संपन्न होत असलेल्या यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) च्या स्पर्धा विभागात करण्यात आली आहे.

‘नशीबवान’च्या दिग्दर्शनासह कथा – पटकथा – संवाद आणि सिनेमॅटोग्राफी अशी जबाबदारी अमोल वसंत गोळे यांनी सांभाळली आहे. गोळे यांची निर्मिती असलेल्या ‘रंगा पतंगा’ या चित्रपटाला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार, पिफ (२०१६) मध्ये संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाला पिफ (२०१५)मध्ये संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि गोळे यांना बेस्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांनी सिनेमॅटोग्राफी केलेल्या ‘हा भारत माझा’ ला पिफ मध्ये संत तुकाराम पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

‘लिओ’ चित्रपटाने मोडले सर्व रेकॉर्ड केली ‘इतक्या’ कोटीची कमाई थलापथी विजयचा 'लिओ' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट, अवघ्या दोन दिवसांत केली इतकी कमाई

१९ (गुरुवार) ऑक्टोबर रोजी चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित झालेल्या थलापथी विजयच्या ‘लिओ’ या तमिळ चित्रपटाने पहिल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *