Breaking News

छगन भुजबळ म्हणाले, सडके खामोश हो गई तो संसद आवारा हो जाएगी ओबीसींच २७ टक्के आरक्षण कायम राहण्यासाठी आपला लढा सुरु राहील

राज्यातील ओबीसी समाजाने काही दिवसांपुर्वीच एक मोठी लढाई यशस्वीपणे लढली आणि विजय मिळवला. आपल्या हक्काचे असलेले राजकीय आरक्षण गेले होते. मात्र ते पुर्ववत करण्यास आपल्याला यश आले आणि राज्यात बहुसंख्य असलेल्या ओबीसींना न्याय मिळाला. आपली लढाई ही इथेच संपत नाही. आपल्याला अजुन लढायच आहे. काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच आरक्षण …

Read More »

सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, गांधी जयंतीपासून ‘हॅलो ऐवजी वंदे मातरम’ सेवाग्राम येथून होणार वंदे मातरम् अभियानाचा शुभारंभ

जनाजनात आणि मनामनांत राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यादृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून त्याच दिवशी ‘हॅलो ऐवजी वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येईल; या अभियानात राज्यातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले केले. राज्य सांस्कृतिक …

Read More »

राहुल गांधी यांच्यासाठी प्रदेश काँग्रेसने केले ‘हे’ दोन ठराव मंजूर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी (AICC delegate) यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे …

Read More »

भाजपाचा दावा, ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच नंबर वन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भाजपा – शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला असून ५८१ पैकी २९९ ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जनतेने या निकालाद्वारे विश्वास व्यक्त केला असून आपण दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुढच्या अधिवेशनात सिंचन प्रकल्पांसाठी निधी

पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि दुष्काळी भागासाठी असलेल्या बळीराजा जलसंजीवनी या केंद्र अर्थसहाय्यीत योजनांबरोबर राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती द्यावी. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या. यामुळे आता केंद्र सहाय्यीत सिंचन योजनांसह राज्यातील सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी मिळणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री …

Read More »

साखर उत्पादनात महाराष्ट्र ठरला जगात तिसरा

राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल …

Read More »

छात्र भारतीचे आव्हान: अनिल बोंडेंच्या घरासमोर आंतरधर्मीय विवाह लावणार छात्र भारतीचे राज्यध्यक्ष रोहित ढाले यांची घोषणा

भाजपाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी आंतरधर्मीय विवाहाविरोधात खाजगी विधेयक मांडणार असल्याचे मत व्यक्त केले. सर्वच आंतरधर्मीय विवाह हे फसवून, धमकावून होत नाहीत हे ठणकावून सांगण्यासाठी येणाऱ्या काळात अनिल बोंडे यांच्या घरासामोरच छात्रभारती आंतरधर्मीय विवाह लावून देणार असल्याचे छात्रभारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले. मुलींना प्रलोभने देऊन, गिफ्ट देऊन धमक्या …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, जनमताचा कौल सध्याच्या सत्ताधाऱ्यांविरोधात अन..

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर असून त्यांनी अहमदनगर व औरंगाबाद येथे शहर व ग्रामीण संघटनेचा आढावा घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांकडून पक्ष वाढीसंदर्भात त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या. मागील काळात आपल्या या जिल्ह्यांनी मोठ्या प्रमाणावर पवारसाहेबांना ताकद दिली …

Read More »

भाजपा म्हणते, शिवसेनेबाबत एकनाथ शिंदे यांची भीती खरी ठरली मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचे वक्तव्य

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला राज्यभरात अभुतपूर्व यश मिळाले आहे. भाजपा हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष झाला असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता आणि मराठी माणसामुळेच हे यश भाजपाला मिळाले असून आम्ही नम्रतेने हा विजय स्वीकारतो. जनतेची सेवा आणखी दुप्पट वेगाने करु, असा विश्वास व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्व. …

Read More »

आंदोलनकर्त्या दुर्गप्रेमींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री थेट आझाद मैदानावर

गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केल. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आझाद मैदान गाठले. आंदोलकर्त्यांची भेट घेतली. गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचे …

Read More »