Breaking News

Editor

मारूती-सुझुकी आणि ह्युंदाईच्या कार विक्रीत किरकोळ वाढ स्पोर्टस युटिलिटी व्हेइकल्सला सर्वाधिक मागणी

देशातील आघाडीच्या कार निर्माते – मारुती सुझुकी (MSIL) आणि Hyundai Motor India (HMIL) – यांनी एप्रिलमध्ये देशांतर्गत विक्रीत किरकोळ वाढ नोंदवली. MSIL, भारतातील सर्वात मोठी प्रवासी कार निर्माते, ची देशांतर्गत विक्री मागील वर्षीच्या याच महिन्यात किरकोळ प्रमाणात १ टक्क्याने वाढली, तर HMIL ची देशांतर्गत विक्री किरकोळ वाढली. एप्रिल महिन्यात MSIL …

Read More »

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना ४८ तास प्रचार करण्यास बंदी

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख के चंद्रशेखर राव यांना लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने ४८ तासांच्या प्रचारापासून बंदी घातली होती. आयोगाने केसीआर यांना पक्षाविरोधात केलेल्या कथित “अपमानजनक” टिप्पण्यांबाबत काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीवर नोटीस बजावली. ६ एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, केसीआर यांनी पत्रकार …

Read More »

कोव्हिशिल्डचे दुष्यपरिणामः सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

साधारणतः दोन-अडीच वर्षापूर्वी भारतासह जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला. तसेच जगही एकाच ठिकाणी थांबल्याचे पाह्यला मिळाले. या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने सिरम इन्स्टीट्युटच्या माध्यमातून (Astrazeneca च्या COVISHIELD) कोव्हिशिल्ड ही लस बाजारात आणली. मात्र ही लस घेतल्यानंतर व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची कबुली नुकतीच कोव्हिशिल्ड या लसीचा फॉर्म्युला …

Read More »

अखेर नाशिकची उत्सुकता संपुष्टातः शिंदे गटाचे हेमंत गोडसेच लोकसभेचे उमेदवार

मागील अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आणि शिवसेना शिंदे गटाकडून तर कधी भाजपाकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. त्यातच लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहिर केले होते. मात्र …

Read More »

महाराष्ट्र दिनी मतदार जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्याचा विशेष उपक्रम

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य समारंभ पार दादर येथे पडला. यावेळी ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४’ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सेल्फी पॉईंट, सह्यांची मोहीम यासह प्रत्यक्ष संवादावर भर देऊन मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला, अशी माहिती ‘स्वीप’च्या मुख्य समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचा …

Read More »

सेक्स स्कँडल आरोपी प्रज्वल रेवन्ना मोदीशहांच्या नाकाखालून परदेशी पळाला

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले. रेवन्नाने ब्लॅकमेल करुन महिलांवर अत्याचार केले व त्यांचे व्हिडिओही बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नराधमासाठी मते मागितली तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याचा उल्लेख श्री. रेवन्ना असा केला. प्रज्वल रेवन्नाने केलेले गुन्हे अत्यंत …

Read More »

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्याने लॉकअपमध्येच केली आत्महत्या

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अनुज थापन (३२) याचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या लॉकअपमध्ये जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला आज १ मे रोजी जीटी रूग्णालयात दाखल करण्यात आला असता तो मृत पावल्याचे पोलिसांनी सांगितले मृत अनुज …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा,….तर संविधान व आरक्षणही संपवणार

काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची कामे केली. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण, जलसंपदा सह सर्वच क्षेत्रात प्रगती केली. काँग्रेसने ६० वर्षात जे उभे केले ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकून टाकले. देश विकून देश चालवला आणि २०५ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर …

Read More »

शिंदे गटाकडून अखेर डॉ श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांना लोकसभेची उमेदवारी जाहिर

कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि तेथील स्थानिक शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख यांच्यात एका जमिनीवरून वाद निर्माण झाला आणि त्या वादाचे पर्यावसन थेट पोलिस ठाण्यात गोळीबार झाल्याच्या घटनेत झाले. त्यानंतर हा मतदारसंघ भाजपाकडून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राला सोडणार का अशी चर्चा सुरु असतानाच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस म्हणाले, समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवू या

उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवू या, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. …

Read More »