Breaking News

मंत्री आणि विरोधी पक्षनेते तुम्ही दुसरा अध्यक्ष नेमलाय का? विधासभा अध्यक्ष नाना पटोलेंची भर सभागृहातच विचारणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना पुन्हा अनुदान देण्याच्या प्रश्नावरील चर्चेच्यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रश्नोत्तरे सुरु झाली. त्यामुळे अखेर सभागृहात अध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांन तुम्ही दोघांनीच दुसरा अध्यक्ष नेमलाय का? अशी मिश्किल विचारणा करत अध्यक्षाकडे बघून बोला अशी सूचना केली. त्यामुळे सभागृहात एकच हशा उसळला.

कायम विना अनुदानित शाळांना पुन्हा अनुदान देण्यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा उपस्थित करण्यात आली. मात्र शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या उत्तराने समाधान झाले नाही. त्यामुळे फडणवीस यांनी पुन्हा उपप्रश्न विचारण्यास सुरुवात केली. या प्रश्नोत्तराच्या चर्चेत अध्यक्षांकडे पाहून बोलण्याचा या दोघांनाही विसर पडला. त्यामुळे अखेर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपली उपस्थिती संबधितांच्या नजरेत आणून देण्याकरीता या दोघांनाही दुसरा अध्यक्ष नेमलाय का अशी मिश्किल विचारणा केल्याने सभागृहात एकच हशा उसळला.

वास्तविक पाहता प्रश्नकर्त्या सदस्याने आणि उत्तर देणाऱ्या मंत्र्याने प्रत्येकवेळी विधानसभेचे अध्यक्षांचे नाव किंवा त्यांच्याकडे बघून विचारण्याचा सांसदीय संकेत आहेत.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *