Breaking News

ब्राम्हण आर्थिक विकास महामंडळाच्या आश्वासनानंतर चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा कोथरूडमधील उमेदवारी मागे घेण्याचे संघटनेची तयारी

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीसाठी कोथरूडमधील स्थानिक उमेदवाराऐवजी बाहेरचा अर्थात कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शविला. तसेच पाटील यांच्या विरोधात उमेदवार दिला. मात्र याप्रश्नी बैठक होत ब्राम्हण महासंघाला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महासंघाने पाटील यांच्या विरोधातील भूमिका मागे घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला.
यासंदर्भात पुणे महानगरपालिकेच्या एका महिला नगरसेविकेच्या घरी बैठक झाली. यावेळी भाजपा हा ब्राम्हण समाजाच्या विकासासाठी झटणारा एकमेव पक्ष असल्याचे पाटील यांनी महासंघाला सांगितले. त्यावर ब्राम्हण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी महासंघाकडून करण्यात आली. तसेच ब्राम्हण समाजाच्या विद्यार्थ्यांनाच्या शिक्षणासाठी मदत करण्याची मागणी करण्यात आली. सत्तेत आल्यानंतर या दोन्ही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ब्राम्हण महासंघास दिले. त्यानंतर महासंघाने त्यांना असलेला विरोध मागे घेत पाठिंबा जाहीर केला.
तसेच याविषयीचे प्रसिध्द पत्रकही जाहीर करत पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. याशिवाय त्यांच्याविरोधात उभा करण्यात आलेला उमेदवारही मागे घेत असल्याचे महासंघाच्यावतीने जाहीर करण्यात आले. ब्राम्हण महासंघाच्या या भूमिकेमुळे चंद्रकांत पाटील यांना दिलासा मिळाला आहे.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *