Breaking News

१ रुपयांची नोट झाली १०० वर्षांची

एक रुपयांची नोट आता तब्बल शंभर वर्षांची झाली आहे.  ३० नोव्हेंबर १९१७ रोजी ही एक रुपयांची नोट प्रथम चलनात आली होती. चांदीच्या एक रुपयाच्या नाण्याच्या जागी ही नोट छापण्यात आली होती. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या वेळी चांदीचा एक रुपया चलनात होता. मात्र, युद्धामुळे सरकारला चांदीची नाणी पुरविता आली नाहीत. त्यामुळे  ३० नोव्हेंबर १९१७ रोजी पहिल्यांदाच एक रुपयांची नोट लोकांसमोर आली.

या एक रुपयाच्या नोटेवर उजवीकडे ब्रिटनचा राजा जॉर्ज पंचमचा फोटो छापला होता. तसेच त्यावेळचे तीन वित्त सचिव एमएमएस गुब्बे, एसी मॅकवाटर्स आणि एच. डेनिंग यांच्या स्वाक्षऱ्याही या नोटेवर होत्या. त्यानंतर खर्च अधिक असल्याने १९२६ मध्ये या नोटेची छपाई बंद केली.  १९४० मध्ये पुन्हा ही नोट छापण्यास सुरूवात झाली.  १९९४ पर्यंत ही नोट छपाई सुरू राहिली. त्यानंतर अाता २०१५ मध्ये पुन्हा एकदा ही नोट चलनात आली आहे. ही नोट भारतीय रिझर्व्ह बँक बाजारात आणत नाही तर भारत सरकारच या नोटेची छपाई करते.

Check Also

सर्वोच्च न्यायालयात मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांचा माफीनामा न्यायालयाने मात्र फेटाळला माफीनामा

सर्वोच्च न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ आर व्ही अशोकन यांनी एका मुलाखतीत पतंजली आयुर्वेद …

2 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *