Breaking News

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न पुरस्कारासाठी लवकरच प्रस्ताव पाठविणार

सामाजिक न्याय मंत्री  श्री राजकुमार बडोले यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि सावित्री फुले यांच्या विचारामुळे महाराष्ट्रात समाज क्रांती घडून  नवसमाज समाज उभा राहिला. तसेच बलशाली राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणाचा पाया रोवला गेला. याशिवाय महिला शिक्षणाचे व सक्षमीकरणाचे दारे खुली झाली. अशा क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारला याबाबतचा प्रस्ताव लवकरच पाठविणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले  यांनी व्यक्त केले.

३ जानेवारी २०१९ सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने पुण्यात सामाजीक न्याय विभागाच्या वतीने  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री बडोले हे सहभागी होत सपत्नीक फुले वाड्यास भेट दिली. त्यावेळी त्यांनी ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फुले वाड्यात एका सामाजिक संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते मार्गदर्शन करताना वरील माहिती दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाजोपयोगी उपक्रम राज्यभर राबविले जात आहेत. समाजसुधारकांनी जो आदर्श घालून दिला आहे.  त्याच पावलावर पाऊल ठेवून राज्य प्रगती करीत असून त्यातून नवनवीन योजना राबविल्या जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 मंत्री राजकुमार बडोले यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी शारदानाताई बडोले देखील उपस्थित होत्या त्याच प्रमाणे समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, बार्टी चे महासंचालक कैलास कणसे ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण श्री अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे विजयकुमार गायकवाड, यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *