Breaking News

सोनम वांगचूक यांचा अमित शाह यांना सवाल, क्या हुआ तेरा वादा…

मागील काही महिन्यापासून लडाखमधील भारतीय भूभागावर चीनी सैन्याचा कब्जा असल्याचे केल्याचा आरोप सातत्याने काँग्रेस आणि सोनम वांग्चूक यांच्याकडून केला जातो. परंतु केंद्र सरकारमधील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सातत्याने भारतीय मालकीची एक इंच देखील जमिनीवर चीनी सैन्याने आक्रमण केले नसल्याचे प्रत्युत्तर दिले जाते. या पार्श्वभूमीवर लडाखमधील चीनी सैन्याच्या आक्रमणाविरोधात लढा पुकारलेल्या सोनम वांगचूक यांनी एक नवा व्हिडिओ एक्स या सोशन मायक्रोब्लॉगिग साईटवर जारी करत थेट अमित शाह यांनाच धारेवर धरत क्या हुआ तेरा वादा असा सवाल केला.

सोनम वांगचूक आपल्या व्हिडिओत म्हणाले की, पश्मिना आंदोलन अद्यापही सुरु आहे. त्यातच चीनी सैन्याने लडाखमधल्या गुराख्यांची जमिनीवर कब्जा केला आहे. त्यातच भारतीय हद्दीत शिल्लक राहिलेल्या जमिनीची विक्री व्यापारी उद्योजकांना करण्यात येत आहे. त्यामुळे लडाखी जनतेची असलेली जमिनीवर त्यांच्याच गुरांना घेऊन जाण्याची परवानगी नाकारली जात आहे. आज काल तर गुरे घेऊन कोणी गेलाच तर त्याला २०-३० किलोमीटर अलीकडूनच परत पाठविले जात असल्याचा मुद्दा निदर्शनास आणून दिला.

पुढे बोलताना सोनम वांगचूक म्हणाले की, आता सत्ताधाऱ्यांचे ट्रोलर आम्हाला देशद्रोही म्हणून संबोधत आहेत, त्यांना वास्तविक पाहता ज्यांना देशद्रोही म्हणायला पाहिजे होते, त्यांना देशद्रोही म्हणण्याऐवजी जे भारतीय नागरिकांच्या जमिनी चीन सारख्या देशाच्या घशात घालत आहेत, उद्योगाच्या नावाखाली मोठ मोठ्या कंपन्यांच्या घशात घालत आहेत आणि येथील सुंदर पर्यावरणीय असलेली हवा दुषीत करत आहे त्यावर मात्र चकार शद्ब बोलायला तयार नाहीत, असेही यावेळी सांगितले.

भाजपाच्या जाहिरनाम्यातील आश्वासनाचा मुद्दा उपस्थित करत सोनम वांगचूक म्हणाले की, ६ व्या परिशिष्टानुसार लडाखला स्वतंत्र राज्याचा राज्याचा दर्जा देणार असल्याचे आश्वासन भाजपानेच त्यांच्या जाहिरनाम्यात दिले होते. तसेच इथली जनतेला लोकशाही प्रदान करणार आणि येथील सीमेचे संरक्षण करणार असल्याची हमी भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूकीच्या काळात दिले होते. या आश्वासनाच्या आधारावर भाजपाने अनेक निवडणूका लढल्या आणि जिंकल्याही. पण आता काही महिन्यापूर्वी अमित शाह यांना लडाखला राज्याचा दर्जा देण्यासंदर्भात येथील राजकिय पक्षाच्या नेत्यांनी भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अमित शाह स्वतः भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला म्हणाले की, जरी पंतप्रधानांनी मला लडाखला राज्याचा दर्जा द्यायला लेखी जरी लिहून दिले तरी मी राज्याचा दर्जा देणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा असे निक्षून सांगितले.

त्यावर सोनम वांग्चूक म्हणाले की, ज्या अमित शाह यांनी लडाखला राज्याचा दर्जा देण्याचे मान्य केले होते, तेच आता राज्याचा दर्जा देणार नाही म्हणून सांगत आहेत. तसेच हेच अमित शाह चीनने एक इंच जमिनीवर कब्जा केला नाही असे सांगतात पण इथल्या शेकडो एकर जमिनीवर चीनी सैन्याने आधीच कब्जा करून ठेवला आहे. त्यामुळे त्यांना मला एकच सवाल विचारावासा वाटतो तो म्हणजे क्या हुआ तेरा वादा असे म्हणतं, या गाण्यातील ओळीमधून तुम्हीच ठरवा कोण विश्वासघातकी आहे आणि देशासाठी लढतय अशी खोचक टीकाही यावेळी केली.

Check Also

एस जयशंकर यांचा दावा, मुंबई दहशतवादमुक्त…तर चीन प्रश्न नेहरूंची चूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे दहशतवाद मुक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *