Breaking News

शरद पवार यांची टीका,… विरोधकांची मानसिकता दिसून येतेय

भाजपाचे शिरुर लोकसभा मतदारसंघात खेड आळंदीचे समन्वयक अतुल देशमुख यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.

पक्षप्रवेशा दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, विविध राजकीय संघटनेमध्ये अतिशय चांगलं काम करणारे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकांचे काम करण्यासाठी सहभागी होत आहेत. देशमुखांनी आज निर्णय घेतला. लोकांचे काम करण्याची भूमिका त्यांनी खेड तालुक्यात बजावली. परंतु, लोकांच्या समस्यात आणि भाजपाच्या धोरणात फरक आहे. त्यामुळेच त्यांनी निर्णय घेतला. मी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, माढा येथील धैर्यशील मोहिते पाटील हे आज भेटण्यासाठी आले होते. येत्या १६ तारखेला धैर्यशील मोहिते पाटील आमच्या पक्षात प्रवेश करतील. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करतील असे यावेळी जाहिर केले.

प्रफुल पटेल यांच्या दाव्यावर फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर बोलताना शरद पवार, त्यांनी जे विधान केले, त्यानंतर आजपर्यंत काय वस्तुस्थिती दिसते. मी भाजपाबरोबर जायला पाठिंबा दिला असे ते म्हणाले. पण भाजपामध्ये कुणी गेले का? तर अजिबात नाही असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

कोल्हापूरात संजय मंडलिक यांनी शाहु महाराजांच्याबाबत केलेल्या विधानावर शरद पवार म्हणाले की, अनेक राजघराण्यामध्ये दत्तक ही गोष्ट नवी नाही. त्यांच्यावर भाष्य केलं म्हणजे विरोधकांनी किती खालची पातळी गाठली ते पाहा. मूळ शाहू महाराजांचा सेवेचा गुण होता, तीच भूमिका शाहू महाराजांनी घेतली आहे. अशा व्यक्तीमत्वावर टीका केली जात आहे, यातून विरोधकांची मानसिकता दिसून येत आहे अशी टीकाही यावेळी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *