Breaking News
Responsive Iframe Example

वंचितसह अपक्ष, लहान-मोठया पक्षाच्या उमेदवारांना ‘या’ चिन्हाचे वाटप

देशातील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची आणि उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत काल संपली. तर महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याची आणि मागे घेण्याची मुदतही संपली. या पाच लोकसभा मतदारसंघापैकी चार लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार जाहिर केले. परंतु वंचित बहुजन आघाडी रोड रोलर, शिट्टी, गॅस सिलेंडर यापैकी एकच चिन्ह मागितले होते. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला या तिन्ही चिन्हाचे वेगवेगळे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीने पाच लोकसभा मतदारसंघापैकी रामटेकमधून उमेदवारी जाहिर केली आहे. परंतु रामटेकमध्ये गॅस सिलेंडर हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. तसेच मान्यता प्राप्त राजकिय पक्षांबरोबरच अपक्ष आणि इतर लहान मोठ्या राजकिय पक्षाकडून एकूण १६ उमेदवार उभे करण्यात आले आहेत. तर नागपूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहिर केला. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात वंचितने उमेदवार उभा केला नाही. परंतु पहिल्या टप्प्यात सर्वाधिक उमेदवार याच मतदारसंघात उभे करण्यात आले असून २६ उमेदवार उभे राहिले आहेत.

याशिवाय भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला आहे. परंतु या लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला ऊस घेतलेला शेतकरी हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला गॅस सिलेंडर हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. तर चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला रोड रोलर हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.

याशिवाय इतर लहान मोठ्या राजकिय पक्षाच्या उमेदवारांना टायर, बॅट, फळांनी भरलेले बास्केट, रिक्षा, रिंग, शाई पेनाची निब, शिट्टी, पाहणे, कोट, टीव्ही, बॅटस्मन, कपाट, नारळाचे झाड, ट्रक, शिलाई मशिन, फ्रिज, एअर कंडिशन, बिस्कीट, स्लेट, पेट्रोल पंप, गॅस शेगडी, मशागत, नांगरलेल्या बोटीत माणूस, खाट, सिंह, डायमंड, हेल्मेट, क्रेन, बॅटरी टार्च, शाळेचे दप्तर, किटली, काळा फळा, रूम कुलर आदी चिन्हाचे वाटप उमेदवारांना करण्यात आले आहेत.

Check Also

ओरिसाचे मुख्यमंत्री म्हणून मोहन माझी यांनी घेतली शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथग्रहण सोहळा

मोहन माझी यांच्या नेतृत्वाखाली ओडिशातील पहिल्या भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा आज (१२ जून) भुवनेश्वर येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *