Breaking News

राज्यातील १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

देशातील लोकसभा निवडणूकांच्या आचारसंहिता लागू करण्याचा कालावधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे प्रमाण वाढू लागले आहे. काल केंद्रिय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ज्या आयएएस अधिकाऱ्यांची सेवा एकाच पदावर तीन वर्षाहून अधिक काळ झाले आहेत, अशा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अश्विनी भिडे आणि पी. वेलारासू यांच्या बदल्याचे आदेश काल राज्य सरकारकडून जारी करण्यात आले.

त्यानंतर आज जवळपास १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये महसूल आणि वन विभागाच्या सनदी अधिकाऱ्यासह अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे वित्त विभागाचे सध्या रिक्त असलेल्या पदावर सुदैवाने नवे सनदी अधिकारी मिळालेले आहेत.

बदली करण्यात आलेल्या सनदी अधिकारी आणि त्यांची विद्यमान पदस्थापना

1. कविता द्विवेदी महापालिका आयुक्त, अकोला यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे या पदावर

2. डॉक्टर हेमंत वसेकर आयुक्त, पशुसंवर्धन पुणे यांची नियुक्ती प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प पुणे या पदावर.

3. श्री कौस्तुभ दिवेगावकर, प्रकल्प संचालक, स्मार्ट, पुणे यांची नियुक्ती आयुक्त, पशुसंवर्धन पुणे या पदावर

4. श्री कार्तिकी एन एस यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे या पदावर

5. श्री मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई या पदावर

6. श्री एम जे प्रदीप चंद्र यांचे नियुक्ती अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय मुंबई या पदावर

7. श्रीमती कावली मेघना यांची, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट या पदावर.

8. श्री विजय सिंगल महाव्यवस्थापक, बेस्ट यांची नियुक्ती उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको मुंबई या पदावर

9. श्री संजय सेठी यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव, परिवहन व बंदरे या पदावर

10. श्री पराग जैन नैनोटिया, प्रधान सचिव (परिवहन व बंदरे) यांची नियुक्ती प्रधान सचिव, (माहिती तंत्रज्ञान) सामान्य प्रशासन विभाग, मुंबई या पदावर

11. श्री ओ पी गुप्ता अप्पर मुख्य सचिव (व्यय) वित्त विभाग यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग या पदावर

12. श्री राजेश कुमार यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग या पदावर

Check Also

१०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *