Breaking News

दिवाळीत ‘या’ दिवशी होईल मुहुर्त ट्रेडिंग

शेअर बाजारातून नफा कमावणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही दिवाळीच्या दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबर २०२३ रोजी देखील ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून नफा मिळवू शकता. दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात सुट्टी असते. पण आता एक तासासाठी तुम्ही बीएसई आणि एनएसईवर स्पेशल मुहूर्त ट्रेडिंग करू शकता. शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक या विशेष ट्रेडिंग सत्राचे आयोजन करतील.

मुहूर्त ट्रेडिंग वेळ २०२३

ब्लॉक डील सत्र – ५:४५ PM – ६:०० PM

प्री-ओपन सेशन – ६:००PM – ६:०८ PM

मुहूर्त ट्रेडिंग – ६:१५ PM – ७:१५ PM

कॉल ऑक्शन सत्र – ६:२०PM – ७:०५ PM

क्लोजिंग सेशन – ७:२५ PM – ७:३५ PM

हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात दिवाळीने होते. तज्ज्ञांच्या मते, मुहूर्ताच्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजारात पैसे गुंतवणे शुभ मानले जाते. दिवाळी ही कोणतीही नवीन सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ मानली जाते. या सत्रात वर्षभराच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना फायदा होतो, असे सांगितले जाते. ट्रेडिंग विंडो फक्त एक तासासाठी खुली राहणार असल्याने बाजार अस्थिर मानला जातो.

इक्विटी, कमोडिटी डेरिव्हेटिव्हज, करन्सी डेरिव्हेटिव्ह, इक्विटी फ्युचर्स आणि ऑप्शन्स आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरोइंग यांसारख्या विविध विभागांमध्ये एकाच वेळेच्या स्लॉटमध्ये ट्रेडिंग होईल. दिवाळी बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर १४ नोव्हेंबरला शेअर बाजार बंद राहणार आहे.

Check Also

ईपीएफओने सुरु केलेल्या या सुविधा माहित आहेत का? तर जाणून घ्या आणि घ्या लाभ

ईपीएफओ EPFO ने शिक्षण, विवाह उद्देश आणि गृहनिर्माण या सर्व दाव्यांसाठी ऑटो क्लेम सोल्यूशन वाढवले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *