Breaking News

सफारी इंडस्ट्रीजकडून बोनस शेअर्स आणि लाभांशांची घोषणा दिवाळीच्या तोंडावर गुंतवणूकदारांना लाभ

लगेज कंपनी सफारी इंडस्ट्रीजच्या भागधारकांसाठी खूशखबर आहे. कंपनीने आपल्या भागधारकांना बोनस शेअर आणि लाभांश देण्याची घोषणा केली आहे. सफारी इंडस्ट्रीजने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. निकाल जाहीर करताना कंपनीने बोनस शेअर्सही लाभांश देण्याची घोषणा केली.

सफारी इंडस्ट्रीज प्रत्येक शेअरसाठी एक बोनस शेअर देणार आहे. याशिवाय कंपनीने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर २.५ रुपये लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. लाभांशाची रेकॉर्ड तारीख १० नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे, लाभाश ३० नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी भागधारकांच्या खात्यात पाठवला जाईल.

सफारी इंडस्ट्रीजला चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर ५३.७ टक्क्यांनी वाढून ३९.८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत महसूल १८ टक्क्यांनी वाढून ३७० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ऑपरेटिंग नफा किंवा EBITDA देखील या कालावधीत ५१.३ टक्क्यांनी वाढून ६३.४ कोटी रुपये झाला आणि EBITDA मार्जिन ३.७० टक्क्यांनी वाढून १७.१ टक्के झाला.

सफारी इंडस्ट्रीजचा शेअर्स गेल्या वर्षी २६ डिसेंबर २०२२ रोजी ५७६.४५ रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता, त्यानंतर तो १० महिन्यांत १८८ टक्क्यांनी वाढून ११ ऑक्टोबर २०२३ रोजी ४.५३५ रुपयांवर पोहोचला. हा त्याचा विक्रमी उच्चांक आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयात मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांचा माफीनामा न्यायालयाने मात्र फेटाळला माफीनामा

सर्वोच्च न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ आर व्ही अशोकन यांनी एका मुलाखतीत पतंजली आयुर्वेद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *