Breaking News

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठीही साम ,दाम ,दंड भेदाची भूमिका घ्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : प्रतिनिधी

पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत साम , दाम, दंड  आणि भेदाची भूमिका मांडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींना कमी करण्यासाठीही हीच भूमिका घ्याल का? असा उपरोधिक सवाल करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. एकीकडे पालघर लोकसभेच्या पोट निवडणुकीचे मतदान सुरु असतानाच आदित्य ठाकरे यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीवर भाष्य करून डाव साधला आहे.

पालघर पोट निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली होती .त्यातच शिवसेनेच्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची ती वादग्रस्त ऑडिओ क्लिपही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर करून एकच खळबळ उडवून दिली होती. या वादग्रस्त क्लिप मध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी साम ,दाम ,दंड ,भेद याचा उल्लेख केला होता. पालघर मतदार संघात पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असून या विषयावर अद्याप पडदा पडला नसतानाच आदित्य ठाकरे यांनी खुबीने इंधन दरवाढीबाबत पुन्हा साम ,दाम, दंड ,भेद या शब्दांचा वापर केला आहे. तसेच २०१४ मध्येही आपल्या पक्षाने जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाच्या किमती कमी ठेवण्याचे वचन दिल्याची आठवणही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना करून दिली.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *